ylliX - Online Advertising Network

सातपूर परिसरात असलेल्या कामगारनगरमध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड

नाशिकमध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड वर्षभरातील वाहन तोडफोडीची तिसरी  मोठी घटना

नाशिक : प्रतिनिधी

 नाशिक शहरात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यात सातपूर परिसरात असलेल्या कामगारनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी आठ चारचाकी गाड्यांची तोडफोड करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमध्ये मध्यरात्री  रात्री १२ वाजेदरम्यान कामगारनगर मध्ये दोन गटामध्ये वाद झाले होते. त्यातूनच ही घटना घडली असल्याचे पोलिसाकडून प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाचे नुकसान करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी १० ते १५ संशयित आरोपी, रात्री वाद घालणाऱ्या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले. रात्रीच्या सुमारास बाहेर मोठा आवाज वाद सुरु असल्याचे नागरिकांना माहिती असून देखील भीती पोटी कोणी बाहेर निघाले नाहीत.

सदर परिसरातील स्टेट लाईट गेल्या दिवसापासून बंद असल्याने सदर टवाळखोर असे उपद्रव  करून भीती पसरवत असल्याचे नागरिक सांगत होते. पोलीसांची देखील याठिकाणी गस्त नसल्याचे नागरिकाची तक्रार आहे. सदर घटना समजताच पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सोनवणे यांनी घटनास्थळी पाहणी करून चौकशी केली.

तोडफोडमध्ये नुकसान झालेल्या वाहनामध्ये एमएच ४१  सी  ४६७०  समाधान धनगर छोटा हत्ती , एमएच १५ ई जी ०२५२  पप्पू पाटील छोटा हत्ती, एमएच १८  बी ००९९  भास्कर निकम आयकोन फोर्ड, एमएच ०३  सी १०४० संतोष लहाने मारुती ८००, एमएच १५ डीएस १५४६ सुनील पाटील मंजिक टाटा ,एमएच १५  डीसी  ६३१३  मारुती झेन, एमएच ४१ सी १८४३ ओम्नी व्हन,नाना पाटील,एमएच १५ आर १०४७ मारुती ८०० विठ्ठल चव्हाण,अशा आठ वाहनाचे काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे.

नागरिकांनी परिसरात टवाळखोर मुलांचा कायम वावर असल्याने परिसरातील महिलांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने पोलीस चौकीची मागणी यावेळी पोलीस उपायुक्त कोकाटे यांच्याकडे केली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.