ylliX - Online Advertising Network

शहर भाजपा : सरदार वल्लभभाई पटेल , स्व.प्रमोद महाजन यांना अभिवादन

सरदार वल्लभभाई पटेल यांना भाजपातर्फे अभिवादन….

नाशिक:लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात मध्य-पश्चिम मंडलाचे अध्यक्ष देवदत्त जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.भाजपा महानगर सरचिटणीस पवन भगुरकर, देवदत्त जोशी, भारती बागुल, महेश सदावर्ते आदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर मनेागत व्यक्त केले. यावेळी सुजाता करजगिकर, उदय रत्नपारखी, ऋषिकेश ठाणगावकर, सुरज राठी,  कुणाल निफाडकर, पुष्पा शर्मा, अरुण शेंदुर्णीकर, विजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

प्रमोद महाजन यांची जयंती भाजपा कार्यालयात साजरी…

नाशिक: भाजपाची बुलंद तोफ, माजी केंद्रीय मंत्री स्व.प्रमोद महाजन यांची जयंती भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी मध्य-पश्चिम मंडलाचे अध्यक्ष देवदत्त जोशी यांच्या हस्ते स्व.प्रमोद महाजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. पवन भगुरकर, देवदत्त जोशी, भारती बागुल, महेश सदावर्ते आदींनी मानोगत व्यक्त केले. यावेळी अजिंक्य साने, सुजाता करजगिकर, उदय रत्नपारखी, पुष्पा शर्मा, अरुण शेंदुर्णीकर,गणेश कांबळे, वसंत उशिर, विजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.