ylliX - Online Advertising Network

SARAF BAZAR NASHIK नासिक सराफ बाजार आता मंगळवारीही सुरू रहणार

SARAF BAZAR NASHIK नव्या कोवीड नियमावलीच्या पार्श्वभूमीवर असोसिएशनने घेतला निर्णय.नाशिक शहरात वाढणाऱ्या कोवीड रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने नव्याने लावण्यात आलेल्या कोवीड नियमावलीला दि नासिक सराफ असोसिएशनने १००टक्के प्रतीसाद देणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान या सर्व पार्श्वभुमीवर मंगळवारची साप्ताहिक सुट्टी रद्द करून सोमवार ते शुक्रवार सलग पाच दिवस प्रशासनाने नमूद केलेल्या वेळेत नासिक सराफ बाजार सुरू राहणार आहे. नव्या नियमावलीत शनिवार व रविवार दिवसभर व्यावसायीक आस्थापणे बंद ठेवण्याचा नियम स्थानिक प्रशासनाने दिला आहे.

त्यातच मंगळवारची साप्ताहिक सुटी अश्या परिस्थितीत अठवड्यातील तिन दिवस बाजार बंद राहिल्यास एकीकडे व्यावसायीकांना याचा आर्थिक फटका बसू शकतो तर दुसरीकडे ग्राहकांचीही ऐन लग्नसराईत सोने खरेदीसाठी गैरसोय होणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेता मंगळवारीही सराफ बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय नासिक सराफ असोसिएशनने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष गिरीश नवसे, सेक्रेटरी किशोर वडनेरे, उपाध्यक्ष मेहूल थोरात यांनी दिली आहे.SARAF BAZAR NASHIK

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.