ylliX - Online Advertising Network

Saptashrungi Gad पुढील ४५ दिवस श्री भगवती मंदिर भाविकांसह सर्वांना प्रत्यक्षदर्शनासाठी संपुर्णतः बंद

२१ जुलै पासून पुढील ४५ दिवस बंद राहणार असल्याची माहिती सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टकडून देण्यात आली आहे…Saptashrungi Gad

याकाळात केवळ मंदिर बंद असेल. येणाऱ्या भाविकांना पहिल्या पायरीवर नतमस्तक होता येणार आहे. विश्वस्त संस्थेच्या वतीने पहिल्या पायरीवर उपकार्यालयाच्या नजीक श्री भगवतीची हुबेहुब प्रतिकृती भाविकांच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून ठेवली जाणार आहे.११/०७/२०२२ रोजी श्री भगवती स्वरुप व मुर्ती देखभाल संदर्भिय पुर्ततेकामी दि. २१/०७/२०२२ ते दि. ०५/०९/२०२२ या कालावधीत श्री भगवती मंदिर बंद बाबतची अधिकृत माहिती

वर्ष २०१२-१३ पासून श्री भगवती स्वरूप / मुर्ती संवर्धन व देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरु असून, सद्यस्थितीत कार्यरत. व विश्वस्त मंडळ यांनी शासनाच्या पुरातत्व विभाग, आय आय टी ई मे. अजिंक्यतारा कन्सल्टंसी, नाशिक यांच्या मार्फत संदर्भिय कृतिकामी तज्ञ मार्गदर्शन प्राप्त करून श्री भगवती स्वरुप / मुर्ती संवर्धन व देखभाल संबंधीत पुर्तता होणे दृष्टीने अंतिम निर्णय घेतला आहे.
Saptashrungi Gad  
श्री भगवती स्वरूप / मुर्ती संवर्धन व देखभाल अनुषंगीक पुर्ततेसाठी गुरुवार दि. २०/२०२२ पासून पुढील ४५ दिवस श्री भगवती मंदिर भाविकांसह सर्वांना प्रत्यक्षदर्शनासाठी संपुर्णतः बंद राहणार आहे. मात्र विश्वस्त संस्थेच्या पहिली पायरी येथे असलेल्या उपकार्यालय श्री भगवती प्रतिकृती भाविकाच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून कार्यरत केली जाणार आहे……….
येत्या गुरुवार (२१ जुलै) पासून मंदिर भाविकांसाठी बंद होणार आहे. ते पुढील ४५ दिवस बंद असेल. श्री भगवती स्वरूप मूर्ती संवर्धन व देखभाल अनुषंगिक पूर्ततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र विश्वस्त संस्थेची पहिली पायरी येथे असलेल्या उपकार्यालयनजीक श्री भगवतीचे हुबेहूब प्रतिकृती भाविकांच्या पर्याय दर्शनाची व्यवस्था म्हणून कार्यरत केली जाणार आहे. तसेच भाविकांना दिल्या जाणाऱ्या महाप्रसाद भक्तनिवास व इतर सुविधा या सातत्यपूर्वक कार्यरत असल्याची माहिती संस्थेच्या प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
Nashik News , Latest Updates From nashik, City, nashik news update,Saptashrungi Gad  
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.