संविधान बचाव रॅली: घरात बॉम्ब बनवणे मेक इन इंडियाचा भाग आहे का? – छगन भुजबळ

मनुस्मृती आणि ईव्हीएम मशिनची होळी; सरकारकडून घटना पायदळी; सरकारच्या धोरणांवर टीका 

नाशिक २३ ऑगस्ट :- एकीकडे मनुस्मृती जाळली म्हणून महिलांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र संविधान जाळले की कुठलाही गुन्हा दाखल होत नाही ही खेदाची बाब आहे. सद्याच्या व्यवस्थेकडून देशात जाती जाती मध्ये लढाया लावण्याचे काम होत आहे. भाजप सरकारने सांगिलते मेक इन इंडिया हे लोक घरातच बॉम्ब तयार करू लागले आहे. त्यामुळे सनातन सारख्या संस्थेवर बंदी आणावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. राष्ट्रवादी महिला विभागाकडून रावसाहेब थोरात सभागृह नाशिक येथे आयोजित ‘संविधान बचाव…देश बचाव’ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. sanvidhan bachav rally manusmruti bomb making chhangan bhujbal ncp nashik

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत, बागलाण तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकरी आणि इगतपुरी येथे रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघातात मरण पावलेल्या युवकाला श्रद्धांजली अर्पण करून छगन भुजबळ म्हणाले की, मनुस्मृती मुळे हजारो वर्ष पददलित आणि महिलांवर अत्याचार होत होते. त्यासाठी महात्मा फुले यांनी त्या काळात आवाज उठविला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरू मानून मनुस्मृती नष्ट करून संविधानाची निर्मिती केली. सध्याच्या व्यवस्थेकडून संविधानाची तत्वे मोडीत काढले जात आहे. देश मागास राहण्यात मनूची वृत्ती कारणीभूत आहे. ही वृत्ती परत रुजविण्याचे काम सध्या केले जात आहे.

या अगोदर देशात विरोधी पक्षांचा सन्मान राखला जात होता. मात्र सद्याच्या सरकार कडून विरोधी पक्षाचा सन्मान न करता आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाकरून आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी असून त्यांचे विचार रुजविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू असे त्यांनी सांगितले.

देशातील आयात निर्यातीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. देशात मुबलक उत्पादन असतांना पाकिस्तानातुन साखर आयात केली जाते, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव वाढला की लगेच निर्यात बंद करण्याचे शासनाचे धोरण चुकीचे आहे. सत्तेवर येण्यासाठी सरकारने जनतेला दिलेल्या विविध घोषणा दिल्या त्यांचे काय झाले? किती लोकांना १५ लाख मिळाले ? नोट बंदीमुळे दहशतवाद संपतील म्हणाले, ते संपले का ? वीज बिल कमी करणार होते ते झाले का ? असे अनेक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले. व  ईव्हीएम मशीन मते खाण्याचे काम करत आहे. sanvidhan bachav rally manusmruti bomb making chhangan bhujbal ncp nashik

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, देशात संविधानिक मुद्यांना हरताळ फसण्याचे काम होत आहे. देशात दारिद्र्य कमी करण्याचे काम होत नाही. देशात महिला बालके सुरक्षित नाही. त्यामुळे संविधान वाचवण्याची गरज आहे. देशात हुकूमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका त्यांनी केली. सरकार विरोधी भूमिका घेतल्याने अनेक पत्रकारांना नोकरी गमवावी लागत आहे. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात असल्याची टीका त्यांनी केली.

समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देण्यात आले मात्र आरक्षणावर गदा आणण्याचे काम सरकारकडून होत आहे. संविधान जाळण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशात महिलांना व्यवस्थेत आरक्षण देण्याचे काम शरद पवार यांनी केले. देशात अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी प्रयत्न होत असतांना मनुवादी लोकांकडून अंधश्रद्धा पसरविण्याचे काम केले जात असल्याची टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की, सनातनच्या लोकाकडे बॉम्ब सापडले त्यांनी कुणाच्या हत्येचा कट रचला होता त्याची माहिती पत्रकारांसमोर खुली करावी असे खुले आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले. भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी संघटित होण्याची गरज असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

माजी मंत्री फौजिया खान म्हणाल्या की, देश उभा करण्यासाठी माणसाला माणूस जोडणे आवश्यक आहे. हे बांधून ठेवण्याचे काम संविधान करते. संविधानाने ते अधिकार दिले आहे. मात्र सद्याच्या व्यवस्थेत द्वेष पसरविला जात आहे. या पद्धतीने सरकारचे काम चालले तर संविधान धोक्यात येईल त्यामुळे  देश टिकण्यासाठी बंधुतेची गरज असून देशात ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यास आमचा विरोध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार विद्या चव्हाण म्हणाल्या की, संपूर्ण देशात महिला, लहान मुलींवर अत्याचार वाढले आहे. शेतकरी शेतमालाला भाव नाही म्हणून शेतमाल रस्त्यावर फेकतो आहे. सध्याच्या सरकार कडून विकासकामे बाजूला ठेवून सुड बुद्धीने कारवाई केली जात आहे. देशात महिला, लहान मुलींवर होणारे अत्याचार आम्ही खपवून घेणार नाही. यावेळी माजी आमदार उषा दराडे, अरुण गुजराथी, सक्षना सलगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री फौजिया खान, माजी आमदार हेमंत टकले, विद्या चव्हाण, दिपिका चव्हाण, नरहरी झिरवाळ,माजी आमदार जयवंतराव जाधव, अॅड.जयदेव गायकवाड, उषा दराडे,  जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी अरुण गुजराथी, ईश्वर बाळबुधे, विश्वास ठाकूर ,श्रीराम शेटे,गफार मलिक, अजिंक्य राणा पाटील, सक्षना सलगर, दिलीप खैरे, नानासाहेब महाले, अर्जुन टिळे, डॉ.भारती पवार, संदीप गुळवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, जळगावच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, नंदुरबारच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती हेमलता, धुळ्याच्या जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष राजश्री घुले पाटील,जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे,नगरसेविका सुषमा पगारे, समीना मेमन, गजानन शेलार, माजी नगरसेविका कविता कर्डक, सुनीता निमसे, महिला पदाधिकारी मंगला पाटील, सुवर्णा शिंदे, रेश्मा आहिर, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे आदी उपस्थित होते. sanvidhan bachav rally manusmruti bomb making chhangan bhujbal ncp nashik

यावेळी महिलांनी मेरा संविधान नृत्य नाटिका सादर केली. त्यानंतर संविधानावरील माहितीपट दाखविण्यात आला. यावेळी संविधान बचाव देश बचाव, महिलांवरील वाढते अत्याचार, महिला आरक्षण, सात बारा, शेतकरी आत्महत्या याचे ठराव संमत करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मनुस्मृती आणि ईव्हीएम मशिनची होळी केली. कार्यक्रमात महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे व शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

sanvidhan bachav rally manusmruti bomb making chhangan bhujbal ncp nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.