Sant Nivruttinath Palkhi Shivshahi नाथांच्या पादुका पालखीसाठी ‘शिवशाही’चा रथ

नाशिक : करोना संकटामुळे यंदा शेकडो वर्षांची परंपरा असलेली पंढरपूर वारी होणार नसून ज्ञानेश्वर माऊलींसह प्रमुख संतांच्या पादुका एसटी बसद्वारे पंढरपुरला नेल्या जाणार आहेत. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुका व मुख्य पुजारी ‘शिवशाही’ बसमधून मंगळवारी (दि.३०) सकाळी आठ वाजता पंढरपुरकडे प्रस्थान करणार आहे. Sant Nivruttinath Palkhi Shivshahi

आषाढीला चंद्रभागेच्या तिरी वैष्णवांचा कुंभमेळा पंढरपुरात भरतो. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, सोपान काका, मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज यांच्यासह राज्यातील मानाचा पालख्या व त्यासोबत शेकडो मैल चालत आलेल्या वारकर्‍यांच्या दिंडयांनी पंढरपूर गजबजते.

यंदा मात्र करोनामुळे वारी होणार नाही, असे राज्यशासनाने स्पष्ट केले आहे. पण मानाच्या पालख्यांची विठ्ठल भेट यात खंड पडू नये यासाठी संतांच्या पादुका हेलिकाॅप्टरने पंढरपूरला नेत शेकडो वर्षांची परंपरा अबाधित ठेवली जाईल, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पण निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे पुजारी पादुका नेण्यासाठी हेलिकाॅप्टर ऐवजी शिवशाही बस उपलब्ध करुन देण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती.

निवृत्ती नाथांच्या पादुकांसाठी शिवशाहीच का?

त्र्यंबकला हेलिपॅड नसल्याने वाहनाने पादुका ओझरला न्याव्या लागतील. पंढरपुरला देखील हेलिपॅड नसल्याने हेलिकाॅप्टरद्वारे पादुका सोलापूर विमानतळावर नेल्या जातील. तेथून वाहनाने पंढरपुरला पादुका नेल्या जातिल. शिवाय हेलिकाॅप्टरमधे पादुकांसोबत फक्त दोन जणांनाच सोबत जाता येईल. हे सर्व बघता हेलिकाॅप्टर ऐवजी शिवशाही बसची मागणी पुजार्‍यांनी केली होती. त्यास जिल्हाप्रशासनाने मान्यता दिली आहे.

श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे मुख्य पुजारी जयंत गोसा भवी यावेळी सांगितले की, मंदिराचे पुजारी, ट्रस्टचे विश्वस्त यांसह २० जण पंढरपुरला जाणार आहेत. जाण्या अगोदर प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली जाईल. येत्या मंगळवारी सकाळी आठ वाजता पंढरपुरसाठी प्रस्थान केले जाईल. Sant Nivruttinath Palkhi Shivshahi

असा असेल पालखीचा प्रवास

मंगळवारी सकाळी आठ वाजता शिवशाही बसमधून मुख्य पुजारी व ट्रस्टचे पदाधिकारी असे २० सदस्य नाथाच्या पादुका घेऊन पंढरपुरकडे रवाना होतील. सायंकाळपर्यंत ते पंढरपुरात पोहचतील.

१ जूनला सकाळी चंद्रभागेत नाथांच्या पादुकांना स्नान घालून नगर प्रदक्षिणा मारली जाईल. द्वादशीला पंढरपुर गाभार्‍यात नाथांच्या पादुकांची भेट व दर्शन सोहळा घडेल. त्यानंतर सायंकाळी गुरुवारी सकाळी शिवशाही बसने नाशिककडे प्रयाण केले जाईल.

‘शिवशाही’ सॅनिटाईज केली जाणार

नाथांच्या पादुका ज्या शिवशाही बसमधून नेण्यात येतील ती बस येतांना व जातांना सॅनिटाईज केली जाईल. बसमध्ये डाॅक्टरांचे पथक सोबत असेल. तसेच पोलिस देखील सोबत असतील. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी एका सिटावर एक जण बसेल.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.