ylliX - Online Advertising Network

त्र्यंबकेश्वर : हरिनामाच्या गजरात निवृत्तिनाथांच्या पालखीचे प्रस्थान; जाणून घ्या दिंडी विषयी

नाशिक :

हरिनामाचा गजर करत संत श्रेष्ठ श्री संत निृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले. सोहळ्यात जिल्ह्यातील सुमारे १५ हजार भाविक सामील झाले आहेत. Sant Nivruttinath Palakhi Dindi Sohla Trimbakeshwar Nashik Pandharpur Hariman Samadhi

यावेळी संत श्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ समाधी मंदिरात मुख्यमंत्री यांचे एस. डी. ओ. श्रीकांत भारती व संस्थान अध्यक्ष संजय धोंडगे यांच्या हस्ते तसेच नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, पालखी मानकरी, भाविक आणि समाधी मंदिर देवस्थानचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन करण्यात आले.

प्रस्थान सोहळ्यात  सुरुवातीला चांदीच्या रथात श्रींच्या चांदीच्या मुखवटय़ासह पादुका पालखीत निवृत्ती ज्ञानदेवांच्या जयघोषात ठेवण्यात आल्या. त्यानंतर कुशावर्त येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांना स्नान घालून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. Sant Nivruttinath Palakhi Dindi Sohla Trimbakeshwar Nashik Pandharpur Hariman Samadhi

यावेळी कुशावर्तावर पादुकांचे पूजन करण्यात केले. त्‍यानंतर पालखीचे त्र्यंबकेश्वर मंदिराकडे प्रस्थान झाले. पुढे पालखीला त्र्यंबकेश्वरच्या प्रवेशद्वारावर निरोप देण्यात आला.

Sant Nivruttinath Palakhi Dindi Sohla Trimbakeshwar Nashik Pandharpur Hariman Samadhi, संत निृत्तीनाथ महाराज पालखी त्र्यंबकेश्वर पंढरपूर

त्यानंतर पालखी महिरावणी त्यानंतर सातपूर येथे मुक्कामी राहून नाशिक शहरात दाखल होईल. नाशिक जिल्हा सोडल्यानंतर अहमदनगर, पुणे आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतून मार्गक्रमण करेल.

यंदा पालखीच्या २५ दिवसांच्या प्रवासाचे नियोजन संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानने केले आहे. २६ व्या दिवशी पालखी श्री क्षेत्र पंढरपुरात पोहोचणार आहे.

संत निवृत्तिनाथांचा समाधी सोहळा दि. १० जुलै रोजी अहमदनगर येथे होणार आहे. आषाढी एकादशी वारी पंढरपूर येथे २३ जुलै रोजी आहे. या वारीच्या पूर्वसंध्येला संत निवृत्तिनाथांची पालखी दि.२२ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचेल.

दशमीपासून ते पौर्णिमेपर्यंत पाच दिवस निवृत्तिनाथ दिंडीचा मुक्काम पंढरपूरमध्ये असतो. पौर्णिमेला दि. २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पालखी परतीच्या प्रवासाला पंढरपुरातून त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करेल.

पालखीचा पंढरपूर पोहोचण्याचा मार्ग २६ दिवसांचा असतो तर परतीचा मार्ग १८ दिवसांचा असतो.

All Photos Credits : Atharva Joshi On Twitter.

Sant Nivruttinath Palakhi Dindi Sohla Trimbakeshwar Nashik Pandharpur Hariman Samadhi
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.