ylliX - Online Advertising Network

Sant Nivruttinath Paduka Dindi नाथांच्या पादुकांचे पंढरपुरास प्रस्थान – फोटो गॅलरी

बातमीच्या शेवटी फोटोज’

नाशिक : करोना संकटामुळे यंदा शेकडो वर्षांची परंपरा असलेली पंढरपूर वारी होणार नसून ज्ञानेश्वर माऊलींसह प्रमुख संतांच्या पादुका एसटी बसद्वारे पंढरपुरला नेल्या जात आहेत. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुका व मुख्य पुजारी ‘शिवशाही’ बसमधून आज मंगळवारी (दि.३०) सकाळी आठ वाजता पंढरपुरकडे प्रस्थान केले. आज रात्री पालखी पंढरपुरात मुक्कामी पोहचतील. Sant Nivruttinath Paduka Dindi

संत श्री निवृत्तिनाथ महाराज #आषाढी_वारी पालखी सोहळा-2020 – आज सकाळी संत श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या पादुका आणि समाधीची पूजा झाल्यानंतर, परंपरेचे अभंग होऊन श्री दादांनी गाडीने श्री क्षेत्र पंढरीकडे प्रस्थान ठेवले.

तत्पूर्वी सकाळी त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात नाथांच्या चांदीच्या प्रतिमेची आणि पादुकांची टाळ मृदुंगाच्या गजरात कीर्तन आणि भजनं गात विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर पवित्र कुशावर्तात नाथांच्या पादुकांना स्नान घालण्यात परंपरेप्रमाणे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे दर्शन घेऊन नाथांच्या पादुका पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाल्या.

नाशिक शहरातील त्र्यंबक रोड, द्वारका आणि विविध ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून पादुकांची पूजा करण्यात आली.

आषाढीला चंद्रभागेच्या तिरी वैष्णवांचा कुंभमेळा पंढरपुरात भरतो. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, सोपान काका, मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज यांच्यासह राज्यातील मानाचा पालख्या व त्यासोबत शेकडो मैल चालत आलेल्या वारकर्‍यांच्या दिंडयांनी पंढरपूर गजबजते.

यंदा मात्र करोनामुळे वारी होणार नाही, असे राज्यशासनाने स्पष्ट केले आहे. पण मानाच्या पालख्यांची विठ्ठल भेट यात खंड पडू नये यासाठी संतांच्या पादुका हेलिकाॅप्टरने पंढरपूरला नेत शेकडो वर्षांची परंपरा अबाधित ठेवली जाईल, असा निर्णय राज्य शासनाने घेतला. पण निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे पुजारी पादुका नेण्यासाठी हेलिकाॅप्टर ऐवजी शिवशाही बस उपलब्ध करुन देण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती.

निवृत्ती नाथांच्या पादुकांसाठी शिवशाहीच का?

त्र्यंबकला हेलिपॅड नसल्याने वाहनाने पादुका ओझरला न्याव्या लागतील. पंढरपुरला देखील हेलिपॅड नसल्याने हेलिकाॅप्टरद्वारे पादुका सोलापूर विमानतळावर नेल्या जातील. तेथून वाहनाने पंढरपुरला पादुका नेल्या जातिल. शिवाय हेलिकाॅप्टरमधे पादुकांसोबत फक्त दोन जणांनाच सोबत जाता येईल. हे सर्व बघता हेलिकाॅप्टर ऐवजी शिवशाही बसची मागणी पुजार्‍यांनी केली होती. त्यास जिल्हाप्रशासनाने मान्यता दिली.

श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे मुख्य पुजारी जयंत गोसावी यावेळी सांगितले की, मंदिराचे पुजारी, ट्रस्टचे विश्वस्त यांसह २० जण पंढरपुरला रवाना झाले. जाण्या अगोदर प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली. त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी आठ वाजता पंढरपुरसाठी प्रस्थान केले. Sant Nivruttinath Paduka Dindi

असा असेल पालखीचा प्रवास

मंगळवारी सकाळी आठ वाजता शिवशाही बसमधून मुख्य पुजारी व ट्रस्टचे पदाधिकारी असे २० सदस्य नाथाच्या पादुका घेऊन पंढरपुरकडे रवाना झाले असून आजच सायंकाळपर्यंत ते पंढरपुरात पोहचतील.

१ जुलैला सकाळी चंद्रभागेत नाथांच्या पादुकांना स्नान घालून नगर प्रदक्षिणा मारली जाईल. द्वादशीला पंढरपुर गाभार्‍यात नाथांच्या पादुकांची भेट व दर्शन सोहळा घडेल. त्यानंतर सायंकाळी गुरुवारी सकाळी शिवशाही बसने नाशिककडे प्रयाण केले जाईल.

प्रत्येकवेळी ‘शिवशाही’ सॅनिटाईज केली जाणार

नाथांच्या पादुका ज्या शिवशाही बसमधून नेण्यात येतील ती बस येतांना व जातांना सॅनिटाईज केली जाईल. बसमध्ये डाॅक्टरांचे पथक तसेच पोलिस देखील सोबत आहेत. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी एका सिटावर एक जण बसलेले दिसले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.