अवैध वाळू माफियांचा त्रास आता नागरिकांच्या जीवावर बेतला आहे. यामध्ये कळवण तालुक्यातील देसराने येथील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकटर व मोटार सायकलचा अपघात झाला होता. या अपघातात एक ठार तर एक जखमी झाला असून त्यांना उपजिल्हा रुग्णलायत उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. कळवण पोलीस ठाणे येथे अज्ञात वाहन विरोध गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू
कळवण तालुक्यातील देसराने येथील रात्री 12 वाजेच्या सुमारे मोटरसायकल वरील पती आणि पत्नी मांडवाच्या कार्यक्रम करून घरी येत असताना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रेकटर ने धडक दिल्याने अपघातात पतीचा जागीस ठार झाला आहे. पत्नी गंभीर जखमी झाली त्याच्या वर कळवण येथील उपजिल्हा रुग्णालय उपचार घेत आहेत.
दरम्यान देसराने गावातील ग्रामस्थांनी रस्ता रोको तात्काळ ट्रकर शोध घेऊन कारवाई करावी अशा मागणीसाठी रस्ता रोको करण्यात आला पोलीस निरीक्षक सुजय घाडगे यांची आश्वासन दिल्या नंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला .