ylliX - Online Advertising Network

बागलाण तालुक्याचा प्रत्येक निवडणुकीत असलेला मुद्दा…

अन्यथा मतदानावर बहिष्कार, मतदारांचा इशारा

सटाणा – (प्रशांत कोठावदे) : चारी नं. ८ ला १९९९ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली व २००५ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. आज काम सुरु होऊन १२ वर्ष झालेत. मात्र मंजुर झालेले ११ केवळ किलोमीटर काम अजुन पुर्ण होत नाही. फक्त आश्वासनांचे पाणी पाजत आजवर तीन आमदार, तीन खासदार याच मुद्द्यावर बागलाणकरांतर्फे निवडून गेले. same election point baglan area voters caveats boycott voting nashik

अनेक अधिकारी या प्रकल्पावर काम करुन गेले. मात्र शेतकरी कोरडाच आहे. जुलै महिन्याअखेर कामास सुरुवात झाली नाही तर लाभक्षेत्रातील गावागावात बैठका घेऊन येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व गावांमध्ये मतदानावर बहिष्कार व पुढाऱ्यांना गाव बंदीचे ठराव करुन ठोस अंमलबजावणी केली जाईल आणि १५ आॅगष्ट रोजी सटाणा तहसिलदार कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे नायब तहसिलदार विनोदकुमार चव्हाण यांना देण्यात आले. same election point baglan area voters caveats boycott voting nashik

यावेळी कृती समितीचे अध्यक्ष नंदकिशोर शेवाळे उपाध्यक्ष नानाभाऊ मोरकर, जेष्ठ मार्गदर्शक सुधाबापु रौंदळ, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रभाकर रौंदळ, केशव मांडवडे, मा. सरपंच बापुराव शेवाळे, लखन पवार, तुषार खैरनार, अपील सोनवणे, प्रविण निकम, योगेश सुर्यवंशी, जगन रौंदळ, हेमंत निकम, देविदास सोनवणे, महेश पवार, राजेंद्र मोहन, अरुण मोहन, किरण पवार, प्रभाकर रौंदळ, अनिल रौंदळ, समाधान ठोके आदींच्या सह्या आहेत.

same election point baglan area voters caveats boycott voting nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.