ylliX - Online Advertising Network

Sambhaji Raje संभाजीराजेंची माघार उद्धव ठाकरे आणि माझ्यात काय संभाषण झाले – केले स्पष्ट

संभाजीराजेंची माघार उद्धव ठाकरे आणि माझ्यात काय संभाषण झाले – केले स्पष्ट Sambhaji Raje

राज्यसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारीवरून राज्यात सध्या घमासान सुरू आहे. राज्यातल्या सहा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. शिवसेनेने दिलेली ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे यांनी आपण खासदारकीच्या निवडणुकीला सामोरं जाणार नसल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे मंत्री, नेत्यांबद्दल खुलासे केले आहेत. सुरुवातीलाच संभाजीराजेंनी महाराष्ट्रातल्या जनतेचेही आभार मानले आहे. राज्यसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द फिरवला. या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटत आहे, असे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी सांगितले. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यसभा निवडणुकीबद्दलची भूमिका स्पष्ट करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, शिवसेनेनं माझ्यासमोर पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवली होती. पण मी स्पष्ट शब्दात नकार दिला होता, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. छत्रपतीला आम्हाला बाजूला ठेवायचे नाही. बरोबर ठेवायचे आहे. त्यामुळे तुम्ही शिवसेनेच प्रवेश करावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला होता ,असे संभाजीराजे यांनी सांगितले. मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

Sambhaji Raje, Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे आणि माझ्यात काय संभाषण झाले, हे मला जाहीर करायचे नव्हते. पण मला आज बोलावे लागतेय. मी सांगतोय त्यापैकी एकही शब्द खोटा असेल तर मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवछत्रपतींच्या कोणत्याही स्मारकावर यायला तयार आहे. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहून उद्धव ठाकरे यांनी सांगावे की, मी खोटं बोलत आहे, असे आव्हान संभाजीराजे यांनी दिले. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले.

Sambhaji Raje
Sambhaji Raje

उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला मला भेटण्यासाठी दोन खासदारांना पाठवले होते. मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये आमची बैठक झाली होती. त्यावेळी मी शिवसेनेत प्रवेश करावा, असा प्रस्ताव खासदारांनी मांडला. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणूनच लढणार, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला. त्यांनी मला वर्षा बंगल्यावर भेटायला बोलावले. मी मुख्यमंत्रीपदाचा मान राखून उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलो. त्यावेळी आमच्यात तीन मुद्द्यांवर चर्चा झाली. तेव्हाही उद्धव ठाकरे यांनी मला, ‘छत्रपती आमच्यासोबत हवेत’, अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हादेखील मी अपक्ष म्हणून लढणारच, असे स्पष्ट केल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.Sambhaji Raje

The state is currently reeling from the Rajya Sabha elections. Elections are being held for six seats in the state. After rejecting the offer made by Shiv Sena, Sambhaji Raje has announced that he will not contest the parliamentary elections. On this occasion, he has made revelations about Chief Minister Uddhav Thackeray and Shiv Sena ministers and leaders. From the beginning, Sambhaji Raje has also thanked the people of Maharashtra. Chief Minister Uddhav Thackeray changed his word about Rajya Sabha elections. I am very sorry about this, said Sambhajiraje Chhatrapati. He was speaking at a press conference in Mumbai on Friday.

Explaining his position regarding Rajya Sabha elections, Sambhaji Raje Chhatrapati said, Shiv Sena had maintained the condition of joining the party before me. But I had categorically refused, said Sambhaji Raje Chhatrapati. Chhatrapati does not want to set us aside. To be right. Therefore, Chief Minister Uddhav Thackeray had proposed to me that you should join Shiv Sena, said Sambhaji Raje. I will not face Rajya Sabha elections, but this is not my retreat, it is my self-esteem, said Sambhaji Raje.

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.