ylliX - Online Advertising Network

aryan Khan DrugsCase आर्यननेच फोन करण्याची विनंती केली होती’; माझ्या जीवाला धोका’, किरण गोसावीचा खुलासा

अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan ) याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) एनसीबीने (NCB) अटक केली आहे. एनसीबीने केलेल्या कारवाई दरम्यान उपस्थित असलेल्या पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने धक्कादायक गौप्यस्फोट केल्यानंतर या प्रकरणाला (Aryan Khan Drugs Case) वेगळे वळण लागले. आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यासोबत सेल्फी घेणारा किरण गोसावी (Kiran Gosavi) याचा बॉडीगार्ड असल्याचा दावा साईल याने केला आहे. त्यामुळे फरार असलेल्या किरण गोसावीचे पुन्हा नाव चर्चेत आले. यातच आता किरण गोसावी याने समोर येते या प्रकरणात काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत.aryan Khan DrugsCase

प्रभाकर साईल याने संपूर्ण प्रकरणात कारवाईनंतर एनसीबीने कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. एवढेच नाही तर आर्यन खानला सोडवण्यासाठी 25 कोटी रुपयांचे डील झाल्याचं सॅम डिसोझा (Sam D’Souza) आणि किरण गोसावी यांच्यात बोलणं सुरु होतं. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी 8 कोटी रुपये द्यायचे आहेत, असं बोलणं ऐकल्याचा दावा साईलनं केला आहे. साईलच्या गौप्यस्फोटानंतर एनसीबीच्या समोरील अडचणीत वाढ (Aryan Khan Drugs Case) झाली आहे.

किरण गोसावी अखेर समोर
आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) नाव आल्यानंतर किरण गोसावी फरार होता. प्रभाकर साईलनं केलेल्या आरोपानंतर किरण गोसावी माध्यमांसमोर आला आहे. त्याने एका हिंदी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखीत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. तसेच समीर वानखेडे यांना आपण ओळखत नसल्याचा दावा किरण गोसावी याने केला आहे.


आर्यनने विनंती केली होती
आर्यन खानसोबत एनसीबीच्या कार्यालयात चर्चा सुरु असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. याबाबत विचारले असता, आर्यन खान यानंच आपल्या कुटुंबीयांशी फोनवर बोलणं करुन द्या अशी विनंती केली होती, असे किरण गोसावीने सांगितले. आर्यन खान स्वत: माझ्याकडे कुटुंबीयांना किंवा त्याच्या मॅनेजरला फोन करण्याची विनंती (Request to call) करत होता. त्यामुळे मी त्याची मॅनेजर पूजा यांना फोन लावून दिला. पण समोरुन फोन उचलला नाही, असे गोसावीने सांगितले.

काय म्हणाला किरण गोसावी ?
मी 6 ऑक्टोबर पर्यंत मुंबईतच होतो. पण मला नाईलाजानं माझा फोन बंद करावा लागला. कारण मला धमकीचे फोन (Threatening phone calls) येणं सुरु झालं. माझ्या जीवाला धोका आहे. मी समीर वानखेडे यांना ओळखत नाही. त्यांना तर मी फक्त टीव्हीवर पाहिले आहे. एनसीबीच्या याआधीच्या कोणत्याही छाप्यांमध्ये माझा सहभाग कधीच नव्हता. त्यादिवशी क्रूझवरील छाप्यावेळी मी फक्त तेथे उपस्थित होतो.

पंचनामा करुन एनसीबीनं सही घेतली
एनसीबीनं पंचनामा करुन माझी त्यावर सही घेतली. मी पंचनामा वाचून सही केली. त्यानंतर एनसीबीच्या कार्यालयातही माझी साक्षीदार (Witness) म्हणून सही घेतली. आर्यन खान माझ्या बाजूलाच बसला होता. त्यानं माझ्याकडे घरच्यांशी बोलणं करुन देण्याची विनंती केली. कारण त्यावेळी त्याचा फोन त्याच्याकडे नव्हता. माझा फोन माझ्या जवळ होता. माझ्या आई-वडीलांशी किंवा मॅनेजरशी माझं बोलणं करुन द्या असं त्यानं मला सांगितलं. म्हणून मी फोन लावून दिला परंतु समोरून फोन उचचला नाही, असं किरण गोसावीने सांगितलं.

प्रभाकर साईलला ओळखतो
किरण गोसावीने पुढे सांगितले की, मी प्रभाकर साईल याला ओळखतो. तो माझ्यासाठी काम करत होता. पण त्यानं केलेल्या आरोपांची मला कोणतीही माहिती नाही. 11 ऑक्टोबर पासून मी त्याच्या संपर्कात नसल्याचे किरण गोसावी याने स्पष्ट केलं. पुण्यातील केसबाबत खुलासा पुण्यात (Pune) दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत किरण गोसावीने कबुली दिली.माझ्या विरोधात पुण्यात एका जुन्या प्रकरणात नोंद आहे. पण अचानक आता जुन्या केसवरही काम सुरु झालं आहे.माझा शोध घेण्यासाठीची नोटीस जारी करण्यात आली आहे. माझ्या जीवाला धोका आहे.मला तुरुंगात ठार केलं जाईल अशी धमकी मला दिली गेली आहे आणि मला आलेल्या धमकीच्या फोनचे सर्व डिटेल्स माझ्याकडे आहेत.आता तुम्हीच विचार करा मी सुरक्षित आहे की नाही ? असेही किरण गोसावी म्हणाला.aryan Khan DrugsCase

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.