ylliX - Online Advertising Network

स्वच्छ भारत संदेश देत २९ राज्यात फिरणाऱ्या संगीता यांचे रोटरी क्लब नाशिक नॉर्थ  तर्फे स्वागत

महिलांच्या आणि विद्यार्थी वर्गाच्या आरोग्याची  स्वच्छतागृहे आवश्यक

नाशिक : महिलांच्या आणि विद्यार्थी वर्गाच्या अर्थात लहान मुलांच्या आरोग्याची समस्या उभी राहते ती स्वच्छता गृहे नसल्याने किंबहुना असतील तर फार गलिच्छ असतात, त्यामुळे त्याकडे सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आम्ही याबाबत शाळा विशेतः ग्रामीण शाळेत या विषयी जागृती करणार असून गरज असेल तेथे स्वच्छता गृह उभारणार असे मत रोटरी क्लब ऑफ नशिक नॉर्थचे अध्यक्ष मनीष ओबेरॉय यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ नॉर्थ तर्फे संपूर्ण देशात २९ राज्य आणि २९ हजार किमीचा प्रवास करत स्वच्छ भारतचा संदेश देत असलेल्या संगीता श्रीधर यांचे स्वागत करण्यात आले, यावेळी संगीता यांच्या उपक्रमास रोटरी क्लबचा पाठिबा असल्याचे ओबेरॉय यांनी सांगितले.

महात्मा गांधी यांचे १५० वी जयंती साजरी होणार आहे, याचे औचित्य साधत मुंबई येथून संगीता श्रीधर यांनी क्लिन इंडिया अर्थात स्वच्छ भारत जनजागृती प्रवास द क्लिन इंडिया ट्रेल ड्राईव्ह  सुरु केला आहे. टाटा तर्फे त्यांना मदत करण्यात आली असून त्यांना प्रवासात कार आणि इतर साहित्याची मदत केली आहे.

संगीता श्रीधर  सांगतात की, देशातील विशेतः महिला यांना फार अवघड पद्धतीने जीवन जगावे लागते, महात्मा  गांधी यांनी  महिला सक्षमीकरण संदेश दिला. हाच विडा मी उचलत महिलासाठी  स्वच्छता गृहे असावीत असा संदेश देत प्रव्साला निघाली आहे. देशातील विशेतः महामार्गावर महिलांसाठी स्वच्छता गृहे असावती यासाठी मी फिरत असलेल्या राज्यातील १५० हून अधिक शहरातील सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांना महिलांसाठी  स्वच्छता उभारावी असे आवाहन करणार आहे.

रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ तर्फे अध्यक्ष मनीष ओबेरॉय, राजेंद्र धारणकर, प्रशांत सारडा, राजेश पंचाक्षरी, जी.एम. जाधव , रमेश मेहेर, नरेश शहा आदी सदस्यांनी संगीता श्रीधर यांचे स्वागत केले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.