नाशकात भरदिवसा दरोडा! गोळीबारात 1 ठार

नाशिक : शहरातील उंटवाडी परिसरातील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात अज्ञातांकडून दरोडा घालण्यात आला आहे. यावेळी झालेल्या गोळीबारात कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला तीन गोळ्या लागल्या. त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. Robbery Mutthot finance Untawadi Nashik firing one died city police

आणखी काही कर्मचाऱ्यांसह तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. यात मात्र दरोडेखोर पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.

पोलीस घटनास्थळी पोहचले असून पंचनाम्यासह पुढील तपासाची चक्रे फिरवली जात आहेत. या घटनेत दरोडेखोर लूट करण्यात अपयशी ठरले असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.

दरोडेखोर 11 वाजेच्या सुमारास शाखेत घुसले. गावठी कट्टे तसेच एकाच्या हातात कुऱ्हाड पाहिल्यानंतर एका कर्मचाऱ्याने सायरन वाजवला. बिथरलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात शाजू सॅम्युअल (32) यांना तीन गोळ्या लागल्याने त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर चंद्रशेखर देशपांडे, कैलास जैन अशी जखमींचे नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

कार्यालयातील थरार :

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोर तीन दुचाकीवरून कंपनीचे कार्यालय असलेल्या इमारतीजवळ आले. सकाळी साडे अकराच्या सुमारास ते त्यांच्याकडे असेल्या बंदुका घेऊन ते कार्यालयात शिरले. कार्यालयातील सात कर्मचारी आणि तेथील काही ग्राहकांना त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून एका बाजूला नेले. त्यांनी सॅम्युअल आणि कैलाश जयन (२५) यांना कार्यालयाच्या मागील बाजूस बघताच त्यांनाही खेचून पुढे आणले. याचवेळी सॅम्युअल यांनी प्रसंगाचे अवधान दाखवत जवळील अलार्मचे बटन दाबले.

सम्युअल यांनी चोरांच्या तावडीतून सुटत शाखेचे व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे (६४) यांच्या मदतीला धावला. देशपांडे यांच्याकडे असलेल्या तिजोरीच्या (स्ट्रॉंग रूम) चाव्या मिळाव्यात म्हणून बंदुकीच्या मागच्या बाजूने देशपांडे यांच्या डोक्यावर प्रहार केले जात होते.

आणखी सविस्तर वृत्त लवकरच

Robbery Mutthot finance Untawadi Nashik firing one died city police
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.