ylliX - Online Advertising Network

लग्नकार्य सुरु असताना वधूचे दागिने चोरणारा गजाआड

नाशिक : लग्नकार्य सुरु असताना वधूच्या खोलीत कोणी नाही अशी संधी साधून दागिने लांबवनाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी राजेंद्र जाधवला मंगल कार्यालयाच्या सीसीटीव्हीमध्ये प्रताप कैद झाले होते. त्यावरून म्हसरुळ पोलिसांनी त्यास पकडले.

मारी लिंक रस्त्यावरील औदुंबर लॉन्स मध्ये १ मार्च रोजी झालेल्या लग्न सोहळ्या दरम्यान हा प्रकार घडला होता. वधूच्या खोलीत सामसूम असताना तिचे एक अख ७० हजार रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले होते. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. लॉन्सच्याच सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत राजेंद्र जाधवला (रा. भद्रकाली परिसर) पोलिसांनी अटक केली. जाधवनेच २०१४ साली अशाच प्रकारे पंचवटी परिसरात चोरी केल्याचा गुन्हा नोंद आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.