ylliX - Online Advertising Network

robbery मेट्रिक्स डीस्टीब्युटर्स दरोडा ; २ आरोपींसह ४१ लाखाचा मुद्देमाल जप्त

भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दतील तिग्रानिया रोड वरील मेट्रिक्स डीस्टीब्युटर्स प्रा. ली कंपनीचे 22 जुलै रोजी अज्ञात इसमांनी गोडाऊन फोडून नेलेल्या एकूण 22 लाख 1 हजार 731 रुपयांचा माल ट्रकसह भद्रकाली पोलीस ठाणे पोलिसांच्या हाती लागलाय.robbery

दिनांक २२/०७/२०२० रोजी रात्रीचे सुमारास भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील तिगराणीयारोड, गोदावरी ए.आय.टी.सी, नाशिक| येथील मेट्रीक्स डिस्ट्रीब्युटर्स प्रा.लि. कंपनीचे गोडावून अज्ञात आरोपीतानी फोडुन गोडावून मधुन वेगवेगळया कंपनीची १३२ एल ई.डी. टि.व्ही. व वेगवेगळया कंपनीचे एकुण ०६ ए.सी. व रोख रुपये ३०,०००/- असा एकुण २२,०१,७३१ /- रुपये किंमतीचा माल एका ट्रक मध्ये टाकुन ट्रक सह पळून गेले बाबत भद्रकाली पोलीस स्टेशन येथे दिनांक २३/०७/२०२० रोजी घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

जप्त केलेला मुद्देमाल

सदर गुन्हयाचे घटनास्थळी गुन्हेशाखा युनिट क. १ कडील पोलीस निरीक्षक श्री. आनंदा वाघ, सपोनि. महेश कुलकर्णी व इतर पोलीस| अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देवून घटनास्थळाची पहाणी करुन समांतर तपास करीत असतांना सदरचा गुन्हा करणारे आरोपी हे गुजरात राज्यातील पंचमहल जिल्यातील गोध्रा येथे असल्याची गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने बातमी मिळाली असता पोलीस निरीक्षक श्री. आनंदा वाघ यांनी बातमी संबंधाने वरिष्ठ अधिकारी यांचेशी चर्चा करुन त्यांनी गुन्हेशाखेचे सहा.पोलीस आयुक्त श्री. समीर शेख, पो.निरी. श्री. आनंदा वाघ, सपोनि. श्री. महेश कुलकर्णी, पोहवा वसंत पांडव, पोना. शांताराम महाले, पोकॉ. गणेश वडजे, राकेश हिरे,चालक पोहवा नाझिम पठाण, चालक पोशि. दत्तात्रय बोटे, अशांना आरोपीतांचा शोध घेणे बाबत मार्गदर्शन करुन रवाना केले होते.

सदरचे तपास पथक हे गुजरात राज्यातील पंचमहल जिल्हयातील गोध्रा या गावी पोहोचल्यानंतर त्यांनी तेथील गोध्रा टाऊन बी.डीव्हीजन पोलीस स्टेशन कडील स्थानिक पोलीसांची मदत घेवून गुन्हे तपासाचे कौशल्य वापरुन सदरचा गुन्हा करणारे आरोपी नामे १) अश्फाक अब्दुल्ला जबा, रा. धंतेया प्लॉट, अमिरपुररोड, गोध्रा जि. पंचमहल, २)खालीद याकुब चरखा. गुहीया मोहल्ला, चौक नं. ४, गोध्रा, जिल्हा पंचमहल हे गोध्रा टाऊन बी डीव्हीजन पोलीस स्टेशन हद्दीत मिळून आल्याने || त्यांना शिताफीने ताब्यात घेवून त्यांचेकडेच सदर भद्रकाली पोलीस स्टेशन कडील घरफोडी चोरीच्या गुन्हया संबंधाने बारकाईने विचारपूस केलीअसता त्यांनी नाशिक शहरातील तिगराणीया रोडवरील

मेट्रीक्स डिस्ट्रीब्युटर्स प्रा.लि. कंपनीचे गोडावून फोडून चोरी केलेले टि.व्ही. व ए.सी, असे ज्या ट्रक मधून आणले होते त्या बाबत माहिती देवून तो किंमत रुपये २० लाखाचा ट्रक व त्यातील किंमत रुपये १८,१८,१२५/- किंमतीचे एल. ई.डी. टि.व्ही. ११९ नग वेगवेगळ्या कंपनीचे व ०८ नग ए.सी. वेगवेगळया कंपनीचे कि. रुपये ३,७०,३९७ चे असा एकुण ४१,८८,५२२/ किमतीचा माल काढून दिल्याने सदर मालासह मिळून आलेल्या आरोपीतांना ताब्यात घेवून भद्रकाली पोलीस स्टेशन कडील गुरनं. ३४९/ २०२०भादविक ४५४,४५७,३८०,३४ या गुन्हयात अटक केली आहे. सदर आरोपीतांकडुन

१) रुपये १८,१८,१२५/- कि.चे ११९ नग एल.ई.डी. टि.व्ही.२) रुपये ३,७०,३९७/- कि.चे ८ नग ए.सी.३) रुपये २०,००,०००/- कि.चा ट्रक चोरी करतांना वापरलेला.४१,८८,५२२/- असा एकुण मुद्देमाल हस्तगत केला आहे.पकडलेले आरोपी यांची आंतरराज्यीय टोळी असुन त्यांचे विरूध्द गुजरात,महाराष्ट व इतर राज्यांत मालाविरूध्द गुन्हे दाखल आहेत.

दि.२१/७/२०२० रोजी देखील त्यांनी सिन्नर पो.स्टे.चे हद्दीतुन टायर गोडवून फोडून २०९ टायर्सची चोरी केलेली असुन गुजरात राज्यातील जिल्हा सुरेंद्रनगर मधील पायला पो.स्टे. हद्दीतुन देखील नमुद आरोपीतांनी दिनांक १८/०७/२०२० रोजी पहाटेच्या सुमारास टायरचे दुकान फोडुन कि.रु.२,८६,०००/- रु.कि.चे टायर चोरी केलेली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अशा प्रकारचे नमुद आरोपीतांकडुन ०३ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. वरील नमुद पोलीस तपास पथकास मा. पोलीस आयुक्त सो. नाशिक शहर यांनी ५०,०००/- रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. विश्वास नागरे पाटील सो. पोलीस आयुक्त नाशिक, मा श्री लक्ष्मीकांत पाटील, सो. पोलीस उप आयुक्त गुन्हेव विशा नाशिक शहर, मा. समीर शेख, सहा पोलीस आयुक्त गुन्हेशाखा, नाशिक शहर मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे पो.निरी, आनंदा वाघ, सपोनि. महेश कुलकर्णी, सचीन खैरनार, दिनेश खैरनार, पुष्पा निमसे, पोउनि पालकर, सपोउनि. पोपट कारवाळ, पोहवा/ वसंत पांडव,प्रविण कोकाटे, अनिल दिघोळे, संजय मुळक, पोना. शांताराम महाले, आसिफ तांबोळी, विशाल काठे, दिलीप मोंढे, मनोज डोंगरे, संतोष कोरडे, राजेंद्र लोखंडे, मोहन देशमुख, रावजी मगर, पो शि., गणेश वडजे, विशाल देवरे, राहुल पालखेडे, प्रविण चव्हाण, सचीन अजबे गौरव खांडरे, निलेश भोईर, राकेश हिरे, प्रतिभा पोखरकर चालक चा.पो.हवा. नाझिम पठाण व चालक पोशि. समाधान पवार, दत्तात्रय बोटे, यांनी| संयुक्तीक रित्या केलेली आहे.robbery

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.