Red Onion लाल कांद्याचे भाव दोन हजार रुपयांनी पडले, हे आहे कारण

बाजरातील तेजी आणि मिळणारा योग्य पाहून शेतकरी आपला लाल कांदा विक्री करत आहेत. त्यामुळे मागच्या आठवड्यात जवळपास २० रु इतका भाव कांद्याला मिळाला होता. त्यामुळे शेतकरी आनंदात होता, मात्र आज बाजारात तेजी असून सुद्धा भाव पडल्याने शेतकरी संतापला आहे. देशातील सर्वात मोठ्या लासलगाव येथे जवळपास दोन हजार रुपयांनी भाव पडले आहे.(Red Onion)

कंद्र सरकारने किरकोळ बाजारातील कांदा भाव पाहता ते वाढू नये म्हणू  कांदा साठवणुक करणाऱ्यांनवर कारवाई करा असे आदेश दिले होते. त्यमुळे कारवाईच्या संभाव्य भीतीने आज  व्यापारी वर्गाने कांदा हवा त्या प्रमाणत खरेदी केली नाही तर आखडता हात घेतला,  सोमवारी सकाळी लाल कांदा दरात एकाच दिवशी २२०० ते ४६०० रूपयांनी एका फटक्यात घसरण झाली. हा भाव घसरला  त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये संताप दिसून आला होता. लासलगांव बाजार समितीत सोमवारी सकाळी सत्रात शनिवारच्या तुलनेत २२०० तर शुक्र वारच्या तुलनेत ४६०० रूपये कमाल भावात घसरण दिसून आली आहे.

सकाळी ५२२ वाहनातील ५२४८ क्विंटल लाल कांदयाला किमान २१०० ते कमाल ५६०१ रूपये तर सरासरी ४२०० रूपये भाव जाहीर झाला. शनिवार दिनांक ७ डिसेंबर रोजी २२२ वाहनातील १८४८ क्विंटल लाल कांदा किमान २४०० ते कमाल ८७०० व सरासरी ७१०० रूपये भावाने विकला गेला होता. कांदा भाव जर असेच पडले तर ज्यांच्याकडे कांदा आहे त्या शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने कारवाई न करता व्यवहार होऊ द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.(Red Onion)

इथे वाचा : आजचा कांदा बाजार भाव – 9 December 2019

Share this with your friends and family

You May Also Like

3 thoughts on “Red Onion लाल कांद्याचे भाव दोन हजार रुपयांनी पडले, हे आहे कारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.