ylliX - Online Advertising Network

नाशिक महापालिकेत नोकरभरती

या पदांसाठी होणार भरती

वैद्यकीय अधिकारी – ३२,

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – ४, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – १३, कनिष्ठ अभियंता (विद्युत) – २, मिस्तरी – १७

नाशिक : येत्या एप्रिल महिन्यात महापालिकेत सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे वैद्यकीय अधिकारीपदासाठी ३२, कनिष्ठ अभियंता १९ व मिस्तरी संवर्गातील १७ रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून कमी मनुष्यबळामुळे कामे करण्यास गती कमी झाल्याच्या तक्रारीची प्रशासनाची अडचण दूर होण्याची चिन्हे आहेत. पुढील महिन्यात होणार्या या भरतीसाठी ‘महाऑनलाइन’ या राज्य शासनाच्या नोकर भरती प्रक्रिया राबविणाऱ्या संस्थेसोबत चर्चा सुरू असून पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.

शहराची वाढती लोकसंख्या, सेवा निवृत्त होत असलेली अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची संख्या यामुळे मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेतील मनुष्यबळ कमी पडत आहे. मात्र महापालिकेचा आठपानावरील खर्चाच्या मर्यादेमुळे ही पदे भरण्यास अडचणी येत होत्या. यापूर्वी एप्रिल, मे २०१६ मध्ये महापालिकेने शासनास आस्थापनेवरील मर्यादा हटवून अभियांत्रिकीच्या जागा भरण्यासाठी परवानगी मागितली होती त्यास आत्ता मंजुरी मिळाली आहे.

याच पद्धतीने वैद्यकीय अधिकारी या संवर्गातील वैद्यकीय अधिकार्‍यांची सरळसेवा पद्धतीने भरती करण्यास परवानगी मिळाली आहे. याबाबतचा प्रस्ताव १ जून २0१६ रोजी शासनास सादर केला होता.

डिसेंबर २0१६ मध्ये झालेल्या महासभेत या पदांच्या भरती प्रक्रियेसाठी प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार आता ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

स्मार्ट सिटीच्या एसपीव्ही कंपनीसाठी होणार भरती प्रक्रिया

नाशिकमध्ये केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसपीव्ही कंपनीकरीता देखील प्रमुख अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाणार आहे. सरळसेवेने भरती प्रक्रीयेद्वारे ही पदे  भरली जाणार आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.