ylliX - Online Advertising Network

real Shiv Sena निवडणूक आयोगाने सांगितलं ‘खरी शिवसेना’ कोणाची

‘धनुष्यबाण’ पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ‘धनुष्यबाण’ हे शिवसेनेचं चिन्ह कोणाला मिळणार, याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. मात्र, खरी शिवसेना कोणाची आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह कोणाला मिळणार, याबाबत निवडणूक आयोग कशाच्या आधारे निर्णय घेणार, असा प्रश्न पडला आहे. त्यात आता निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया आली आहे.real Shiv Sena

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राजीव कुमार म्हणाले, “शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता द्यावी अथवा चिन्हावरती निर्णय देताना पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. शिवसेनेच्या बाबतीत ‘बहुमताच्या आधारे’ चाचपणी करून निर्णय घेतला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचल्यानंतर यावरती कारवाई करू,” असेही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

वाजत गाजत या, पण परंपरेला गालबोट लागेल असे वागू नका;

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केली आहे. माझ्या बहीणी, भावांनी आमच्या परंपरेला पुढे न्यायचे आहे म्हणून शिस्तीने वागावे. आमच्यावर कोणी बोट दाखविण्याची हिंमत करू नये, असे ठाकरे म्हणाले.

Dasara Melava Update: … तर भविष्यात परवानगी नाकारण्याचे कारण ठरेल; उच्च न्यायालयाची ठाकरेंना महत्वाची अट

शुभ बोल नाऱ्या सारखे वागुयात. विजया दशमीच्या दिवशी माझ्या आजोबांनी पहिला मेळावा घेतला होता. कोरोनाच्या काळातील अपवाद वगळता हा मेळावा आजवर नियमित झालेला आहे. राज्य सरकार आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडेल, अशी अपेक्षा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Big Breaking: शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच ‘आवाssज’; ‘शिवतीर्था’वर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी

सर्वोच्च न्यायालय शिवसेनेच्या वादावर जो निकाल देईल तो देशाच्या लोकशाहीचे भविष्य ठरविणारा निकाल असेल असे ठाकरे म्हणाले. न्यायदेवतेवर मी संशय घेतलेला नाही असेही ते म्हणाले. आजचा हा लोकशाहीच्या विजयाचा दिवस आहे. न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला, असे ठाकरे म्हणाले. सदा सरवणकरांनी केलेल्या गोळीबारावरून विचारले असता मी आता मुख्यमंत्री नाहीय. आजच्या दिवशी राज्य सरकारवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सोपविली आहे. मी आमच्या वकिलांचे देखील आभार मानत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

निकालाच्या वेळी उद्धव ठाकरे शिवसेना भवनामध्ये होते. तेव्हा तिथे जल्लोष करणाऱ्या शिवसैनिकांना त्यांनी अशाच आपल्याला राज्यातील महापालिका देखील जिंकायच्या आहेत, असे म्हटले होते.real Shiv Sena

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.