माहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी अमेरिकेला गेलो होतो. कोरोना विषाणू संदर्भात भारतात (नागपुरात) परतल्यावर त्यापैकी 3 सहकाऱ्यांना कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटीव्ह आली. हे ऐकून मी घरीच स्वत:ला क्वारंटाईन केलं. आणि नंतर माझ्या सेाबत आलेल्या मित्रांसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी गेलो. मला असिम्टोटिक कोरोना झाल्याचं निदान झालं. म्हणजे कोरोनाची कोणतीही बाह्य लक्षणं मला नव्हती. Quarantine Corona

तरी मला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. कोरोना असल्याचं कळलं. त्यामध्ये मला मल्टीविटामीनच्या गोळ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी देण्यात आल्या. कोरोना ट्रिटमेंटच्या प्रोटोकॉलनुसार सुरूवातीला मला आयोसलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले. खरं म्हणज सुरूवातीला थोडं टेन्शन आलं होतं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मला बरे वाटले.मात्र मला आयसोलेशन करण्यात आलेल्या वार्डमध्ये मी स्वत:साठी टाईमटेबल बनविला. त्यात मी वाचन, रुममध्येच वॉक, यु-टयूबवरील सकारात्मक व्हिडिओचा समावेश होता. Quarantine Corona
या काळात मी कटाक्षाने कोरोनासंबंधित नकारात्मक बातम्या किंवा अन्य साहित्य वाचले नाही. कोरोनाचा मृत्यूदर कमी असल्याचे मी वाचले. त्यामुळे मला हॉस्पिटलमार्फत देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचं मी काटेकोरपणे पालन केले. माझ्या आजारादरम्यान मला जिल्हा प्रशासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात आले.
आयसोलेशनदरम्यान माझ्यापर्यत कोणी येत नव्हतं. साधारण 7 व्या दिवशी माझ्या घशातील स्त्रावाच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. तो निगेटिव्ह आला. डिस्चार्जनंतरही मला घरी मास्क घालून व घरातील सदस्यापासून दूर राहण्याचे डॉक्टरांनी सांगितले. Quarantine Corona
तसेच या दरम्यान खोकला किंवा सर्दी वाटल्यास तात्काळ दवाखान्यात येण्याच्याही सूचना दिल्यात.
माझ्या मते कोरोनाला योग्य ती काळजी घेऊन पूर्ण हरविता येते. मी एकांतवासाचा सुयोग्य वापर केला होता. रूममध्येच व्यायाम केला. तसेच सकारात्मक विचारांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यासाठी चौरस आहारही घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी घरीच थांबा व सुरक्षित राहा. Quarantine Corona