ylliX - Online Advertising Network

Raut Vs Mahajan राऊत यांच्या विधानांना महाजन यांचे उत्तर !

राऊत यांना पक्षाने दिले बोलण्याचे अधिकार, महायुतीत वाद होतील अशी विधाने नको – गिरीश महाजन  नाशिकचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन नाशिकच्या दौऱ्यावर असून त्यांनी ओल्या दुष्काळाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधाला, गिरीश महाजन यांनी राऊत यांच्या सर्व वक्तव्यांवर मत व्यक्त केले आहे. महाजन म्हणाले की, आम्ही सरकार चालवतांना कोणाला कधी  धमकावले आहे? कोणत्या गुंडांनी कोणाला पकडून जबरदस्ती केली? असे एक तरी उदाहरण शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुढे आणावे, महायुतीत वाद निर्माण होईल अशी विधाने करु नयेत, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.   Raut Vs Mahajan

Shivsena Lerader Sanjay Raut
शिवसेना नेते संजय राऊत

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेकडून येणारी विधाने आणि विशेषतः खासदार संजय राऊत यांनी ‘भाजप हा एखाद्या गुंडांच्या टोळीसारखा पक्ष चालवतो’ या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.  

मोबाईलचा इंटरनेट स्पीड कमी आहे मग ही लिंक करा , काही सोपे टिप्स

महाजन म्हणाले की ”गेली पाच वर्षे राज्यात भाजप- शिवसेना महायुतीचे राज्य होते. मात्र, आम्ही अतिशय चांगला कारभार केला. कोणाला गुंडाने धमकावले? एखाद्याला गुंडाने पकडून अमक्‍यालाच पाठींबा दे असे सांगितले, किंवा पोलिसांनी कोणाला पकडून वेगळे काही केले, असे कुठे घडले असेल तर त्याचे उदाहरण सांगावे. मात्र, विनाकारण शिवसेना- भाजप या दोन्ही पक्षांत मतभेद होतील, वाद वाढेल अशी विधाने करु नयेत,”

तर पुढे बोलतांना ते म्हणाले की ”शिवसेनेने संजय राऊत यांना बोलण्याचे अधिकार दिले आहेत. म्हणून ते बोलत आहेत. आमच्या पक्षाने आम्हाला यावर मत व्यक्त करु नये, अशी सुचना केली आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. आम्ही त्यावर प्रतिक्रिया देणार नाही. मात्र येत्या काही दिवसांत राज्यातील सरकार स्थापनेबाबत योग्य तो निर्णय होईल. तोपर्यंत वादग्रस्त विधाने टाळावीत. दोन्ही पक्षांत मतबेध वाढतील असे बालु नये,” असे मला वाटते.

कसारा घाटात अपघात

सरकार स्थापन होणार ९ तारखेला

महायुतीचे सरकार कधी स्थापन होणार यावर गिरीश महाजन म्हणाले की ”सरकार स्थापनेविषयी 9 नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी असून, त्यामुळे फार चिंता  वाटत नाही. या 9 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेत्यांची बैठक होईल. त्या बैठकीत निश्‍चितपणे तोडगा निघणार असून, वाद राहणार नाही. तेव्हा नक्कीच  सरकार स्थापनेचा निर्णय होईल.” Raut Vs Mahajan

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.