ylliX - Online Advertising Network

वॉनाक्राय रॅन्समवेअर : नाशिक-महाराष्ट्र पोलिसांची विशेष हेल्पलाईन

सबंध जगात धुमाकूळ घालत असणाऱ्या वॉनाक्राय या रॅन्समवेअर बद्दल बरीच चर्चा सुरु असून महाराष्ट्र सायबर पोलीस, नाशिक पोलीस सायबर सेल आणि अँटीव्हायरस कंपनी क्विकहील यांनी संयुक्त विद्यमाने उपक्रम चालू केला आहे. नागरिकांना मदत व्हावी या उद्देशाने ही विशेष सुविधा असून या अंतर्गत विशेष हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आला आहे. महाराष्ट्र सायबर पोलीस इंस्पेक्टर जनरल ब्रिजेश सिंग यांनी ही माहिती दिली आहे.

मनात या रॅन्समवेअर बद्दल भीती असलेले नागरिक, विविध संस्था, व्यावसायिक संस्था, सरकारी आस्थापने यांवर वॉनाक्राय या रॅन्समवेअरने हल्ला केल्याचे लक्षात आल्यास त्वरित त्यावर पाउल उचलून हल्ला टाळण्यासाठी ही विशेष सुविधा आहे.

दि. १६ व १७ मे या दिवशी सायबर सुरक्षा तज्ञांच्या साथीने ०२५३ ६६३१७७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक कॉल वर मालवेअर विशेषज्ञ प्रतिबंधात्मक उपाय सुचवून रॅन्समवेअरचा उपयोग करून होणारा हल्ला थांबवण्यासाठी  प्रयत्नशील असणार आहेत.

एटीएम राहणार बंद, ऑनलाईन व्यवहार करताना तुम्ही ही घ्या दक्षता

Maharashtra Cyber Police to help people in crisis of ransomware attacks- IG Cybercrime Brijesh Singh.

Security Experts are made available on May 16th and 17th on helpline no. 02536631777. Malware Specialists will guide people on prevention and remediation. Maharashtra Cyber in collaberation with Quick Heal is fully geared up. wannacry ransomware special helpline numbar.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.