ylliX - Online Advertising Network

रणजी स्पर्धेतील एक सामना  महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र  नाशिकमध्ये

बीसीसीआयकडून घेण्यात येणाऱ्या रणजी स्पर्धेतील महाराष्ट्रात होणाऱ्या पाच सामन्यांपैकी एक सामना  महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र  नाशिकमध्ये  दिनांक  १४ ते १७ डिसेंबर दरम्यान  होणार आहे. ranji cricket trophy match nashik

या सामन्यात  भारतीय संघातील अनेक खेळाडू  तसेच  आयपीएलमध्ये  प्रतिनिधित्व करणारे खेळाडू  सहभागी  होणार आहेत.त्यामध्ये महाराष्ट्र कडून केदार जाधव तर सौराष्ट्र कडून जयदीप उनाडकट यांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे  नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज  सत्यजित बच्छाव  यालाही  घरच्या मैदानावर  नाशिककरांना  आपला खेळ दाखवण्याची संधी  मिळणार आहे. ranji cricket trophy match nashik

नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र या रणजी सामन्यासाठी बीसीसीआयचे पश्चिम विभागाचे  ग्राउंड क्युरेटर रमेश म्हामूनकर हे आज शनिवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सकाळी वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी मैदानाच्या हिरवळीवर समाधान व्यक्त केले तसेच खेळपट्टी चांगली असून सामन्याच्या तयारीसाठी योग्य सूचना केल्या. तसेच सामन्यासाठीआवश्यक साधनसामुग्री, रोलर्स, ग्रास कटिंग मशीन व इतर साहित्याबाबत माहिती घेतली.

त्याच प्रमाणे खेळाडूंची ड्रेसिंग रूम व इतर व्यवस्था यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे रणजी सामन्याच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आवश्यक सूचना केल्या.  नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी समीर रकटे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी खजिनदार हेमंत देशपांडे, योगेश हिरे, रतन कुईटे, शिवाजी उगले, श्रीपाद दाबक, संजय परिडा, निखिल टिपरी ,अनिरुद्ध भांडारकर, चंद्रशेखर दंदणे, तरून गुप्ता, राजु आहेर ,संकेत बोरसे, उपस्थित होते.

ranji cricket trophy match nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.