महापौरपदासाठी रंजना भानसी तर उपमहापौरपदासाठी प्रथमेश गिते यांचे अर्ज दाखल

भाजपातर्फे महापौरपदासाठी रंजना भानसी तर उपमहापौरपदासाठी प्रथमेश गिते यांचे अर्ज दाखल

पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ करू : रंजना भानसी

नाशिक : नाशिक महापालिकेत स्पष्ट बहुमताने निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीतर्फे सलग पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी यांनी महापौरपदासाठी तर पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवक प्रथमेश गिते यांनी उपमहापौर पदासाठी आपले उमेदवारी अर्ज आज नगरसचिव यांच्याकडे सादर केले. भाजपा चे ६६ नगरसेवक निवडणून आले असून या दोघांची निवड निश्चित आहे. तर मुंबईत भाजपाने शिवसेनेला पाठींबा दिला तसेच नाशिक मध्ये शिवसेना ३५ नगरसेवक त्यांचा पाठींबा देतील असे चित्र आहे. महापौर पदाची औपचारिक निवडणूक १४ मार्च रोजी होणार आहे.

यावेळी आ.बाळासाहेब सानप, आ.सीमा हिरे, माजी आमदार वसंत गिते, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, ज्येष्ठनेते विजय साने, सचिन ठाकरे, सुरेशबाबा पाटील, डॉ.बाळासाहेब आहेर, महिला आघाडी अध्यक्षा रोहिणी नायडू आदी उपस्थित होते.

वसंतस्मृती या भाजप पक्ष कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवक,सर्व आघाड्यांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या बैठकीत शहराध्यक्ष आ.बाळासाहेब सानप यांनी रंजना भानसी तर उपमहापौरपदासाठी प्रथमेश गिते यांची नावे जाहीर केल्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर रंजना भानसी आणि प्रथमेश गिते यांनी आपले अर्ज सादर केले.

पक्षाने उमेदवारी देऊन आपल्यावर जो विश्वास दाखविला तो आपण सार्थ करून दाखविणार,असे रंजना भानसी आणि प्रथमेश गिते यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोण आहेत रंजना भानसी?

महापौरपदाच्या उमेदवार रंजना भानसी या माजी खासदार काचरूभाऊ राऊत यांच्या कन्या असून १९९७पासून सलग महापालिकेवर निवडून येत आहेत.स्थायी समिती सदस्य तसेच विविध पदे त्यांनी भूषविली आहेत.यावेळी महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने सर्वात अनुभवी नगरसेविका म्हणून रंजना भानसी यांचे नाव पुढे आले.भाजपच्या महानगर शाखेने त्यांच्या नावाची शिफारश केली आणि प्रदेश कार्यलयानेही त्यावर शिक्कामोर्तब केल्याने भानसी यांच्या कार्याची ही एकप्रकारे पावतीच म्हणावे लागेल.

प्रथमेश गीते

उपमहापौरपदाचे उमेदवार प्रथमेश गिते हे माजी आमदार वसंत गिते यांचे चिरंजीव आहेत. महापालिकेतील निवडून आलेल्या तरुण नगरसेवकांपैकी ते एक आहेत.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.