लासलगाव येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी

लासलगाव(वार्ताहर)समीर पठाण :

लासलगाव शहर व परिसरात शनिवारी (ता१६) रमजान ईद पारंपारिक पद्धतीने शांततापूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. Ramjan Eid celebration lasalgaon nashik

लासलगाव येथील ईदगाह मैदान येथे मौलाना फारूक अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केली तसेच नुरानी मस्जिद मध्ये मौलाना मंजूर अहेमद मिल्ली यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाज पठण झाले. Ramjan Eid celebration lasalgaon nashik

ईदगाहमध्ये मौलाना फारूक अशरफी यांनी ईदचे महत्व विषद केले व उपस्थितांना रमजान ईद बद्दल सविस्तर माहिती दिली.

Ramjan Eid celebration lasalgaon nashik Ramjan Eid celebration lasalgaon nashik

याप्रसंगी मौलाना फारूक अशरफी यांचा ग्रामपंचायत,पोलीस प्रशासन व महसूल अधिका-यांसह विविध राजकीय पक्षाच्या मान्यवरांनी पुष्पहार घालून सत्कार केला.

यावेळी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी उपस्थित मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. Ramjan Eid celebration lasalgaon nashik

माजी प. स. सदस्य प्रकाश पाटील, मंडल अधिकारी चंद्रशेखर नगरकर, गुणवंत होळकर, राजेंद्र चाफेकर, संतोष ब्रम्हेचा, डॉ विकास चांदर, डॉ अमोल शेजवळ, तलाठी डी. के. नागरे, संतोष पानगव्हाणे, भरत होळकर आदींनी मुस्लीम बांधवाना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.

त्या नंतर मुस्लीम बांधवानी कब्रस्तान येथे जाऊन आपल्या पुर्वजनाच्या कबरीवर गुलाब फुल अर्पण करून व त्यांच्या साठी प्रार्थना केली.

Ramjan Eid celebration lasalgaon nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.