शिवाजी महाराजांची राजमुद्रा अर्थ raajmudra meaning

शिवाजी महाराजांची राजमुद्रा

https://mr.wikipedia.org/s/3tmoJump to navigationJump to search

छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-raajmudra meaning

  • संस्कृत :

A. “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते”

  • मराठी :

ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल.

  • इंग्रजी :

The glory of this Mudra of Shahaji’s son Shivaji will grow like the first day moon .It will be worshiped by the world & it will shine only for well being of people.raajmudra meaning

आपली राजमुद्रा समजुन घेताना शिवछत्रपती कुतूहलापोटी चंद्राच्या प्रतिपदेपर्यंतच्या कलांचे ज्यावेळी निरीक्षण करत असतील तेव्हा त्यांच्या मनात काय विचार असतील याची कल्पना करुन पहा.

अगदी राजमुद्रेत उल्लेख केल्याप्रमाणे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे शिवरायांचे स्वराज्य वाढत गेले. प्रसंगी शस्त्र उचलुन शिवरायांनी रयतेला तिच्या कल्याणाची, रक्षणाची हमी दिली. रयतेला स्वातंत्र्य दिलं, स्वराज्य दिलं, स्वाभिमान दिला. त्यांनी केलेल्या लोककल्याणकारी कार्यामुळे शिवछत्रपती विश्ववंदनीय ठरले. त्यांचे व्यक्तित्व आहेच विश्वव्यापक. स्वतः शहाजीराजेंनीच त्यांच्याकडुन विश्वबंधुत्व आणि विश्वकल्याणाची अपेक्षा ठेवुन राजमुद्रेत “विश्ववंदिता” या शब्दाचे प्रयोजन केले होते.

  • इतिहासाच्या पटलावरील “शिवाजी” हा तीन अक्षरी शब्द स्वतःच एक वेगळा धर्म, जात, प्रांत, राष्ट्र आणि विश्व आहे. त्यांचा जन्म या पृथ्वीवर, भारतवर्षात, महाराष्ट्रप्रांती, हिंदु धर्मात, मराठा जातीत, भोसले घराण्यात झाला हे वास्तव कुणी नाकारत नाही. शिवाजी महाराज हे भोसले, मराठा, हिंदु, महाराष्ट्रीय, भारतवर्षीय किंवा पृथ्वीवासी होते म्हणुन एवढे विश्ववंदनीय कार्य करु शकले नाहीत, तर ते “शिवाजी” होते म्हणुन हे कार्य करु शकले. हीच त्यांची खरी ओळख आहे. त्यांची ओळख उतरत्या क्रमाने व्हावी की उलट चढत्या क्रमाने होत जावी याचा प्रत्येकाने विचार करावा. शिवरायांचे व्यक्तित्व कुठल्याही चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे कर्तृत्व या सगळ्या चौकटी मोडुन त्याच्या पलीकडे जाणारे आहे. राजमुद्रेत सांगितल्याप्रमाणेच विश्ववंदनीय आहे. .raajmudra meaning
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.