भाषेची आवरणे बाजूला सारली तर शिक्षणाची कवाडे आपोआपच उघडली जातात : डॉ मृदुला बेळे

के.के.वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात विवेक युवा विचार सप्ताहाचे तिसरे व्याख्यान

नाशिक(प्रतिनिधी)- कायद्याची भाषा आणि त्याचे अवरण उलगडतांना आपल्याला अनेक अनुभव येत असतात. भाषेची आवरणे बाजूला सारली की शिक्षणाची कवाडेदेखील आपोआप उघडली जातात, असे प्रतिपादन डॉ. मृदुला बेळे यांनी केले. ज्ञानाचे अमूल्य धन मिळविण्यासाठी धडपडणे महत्वाचे आहे असेही यावेळी त्या म्हणाल्या. विवेकवाहिनी नाशिक व विवेक युवा विचार सप्ताह समिती यांच्या विद्यमाने आयोजित “विवेक युवा विचार सप्ताह”चे आयोजन करण्यात आले आहे.

put-aside-anguage-barrier-education-courses-automatically-opened-dr-mridula-belle

१२ ते १९ जानेवारी पर्यंत या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहातील तिसरे व्याख्यान के.के. वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात झाले. “बौध्दिक संपदा धोरण कुणाच्या फायद्याचे” या विषयावर डॉ.मृदुला बेळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

बौद्धिक संपदा मिळविण्यासाठी पेटंटचे अनन्यसाधारण महत्व आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. पेटंटमधील अनेक भाग समजावून घेत आपण त्याचा वापर करायला हवा. भारतातील अनेक कला सुरक्षित करण्याची गरज आहे, व यासाठी पेटंट चा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. पेटंट ही जगातील सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक आहे. पेटंट हे इन्व्हेंशन ला मिळत असतात डिस्कव्हरी ला नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सामान्य माणसाला व व्यवसायकांना कायद्याचे रक्षण मिळणे ही त्याहूनही महत्वाची बाब आहे. पेटंट या विषयाचा शंभर वर्षांचा इतिहास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. बौद्धिक संपदेचे महत्व व प्रकार, त्याचा वापर कुठे व कसा करावा? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस.पचपोर, विवेक युवा विचार सप्ताह समितीचे आयोजक सुरेश नखाते उपस्थित होते. कार्यक्रम सफल होण्यासाठी प्रा. एस.ए. पाटील यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरुण पचपेंड यांनी केले. सागर सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.