ylliX - Online Advertising Network

Public curfew नाशिकमध्ये अनेक भागात जनता कर्फ्यू (video )

नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्य बाजारपेठ आठवडाभर बंद ठेवण्यात आली आहे. आता शहरातील व्यावसायिकांच्या इतर संघटना पुढे येत असून विविध परिसरात बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहे. त्यासोबतच  विविध परिसरात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारपासून शहरातील मोठी उलाढाल ठप्प होण्याची शक्यता आहे. पंचवटी, आडगाव, उपनगर, सिडको, इंदिरानगर, नाशिकरोडमधील व्यावसायिकांच्या संघटनांनी पुढील चार ते पाच दिवसांचा बंद जाहीर केला आहे. तर काही ठिकाणी जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या सर्व परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा मोठा असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सदरचा निर्णय घेतला आहे. Public curfew

नाशिक शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्य बाजारपेठा असलेल्या मेन रोड, शालिमार येथे आठवडाभर बंद पाळण्याचा निर्णय झाल्यानंतर आता व्यावसायिकांच्या इतर संघटना पुढे येत असून विविध परिसरात बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहे. पंचवटी, आडगाव, उपनगर, सिडको, इंदिरानगरच्या व्यावसायिकांच्या संघटनांनी पुढील चार ते पाच दिवसांचा बंद जाहीर केला आहे.Public curfew

पंचवटीत आठवडाभर “जनता कर्फ्यू’ 
पंचवटी शहरातील कोरोनारुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पंचवटीतील रुग्णांची संख्या अधिक असल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे “आपण पंचवटीकर’तर्फे मंगळवार (ता. 23)पासून ते पुढील मंगळवार (ता.30)पर्यंत आठ दिवस “जनता कर्फ्यू’ जाहीर करण्यात आला आहे. 

बाजार समिती सुरूच राहणार 
कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारा माल नाशवंत असतो. याशिवाय अधीच अडचणीत सापडलेल्या बळीराजाला त्यातून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे बाजार समितीसह खते, बी-बियाण्यांची दुकाने सुरूच राहणार आहेत. याशिवाय दवाखाने, औषधांची दुकानेही सुरूच राहतील. पंचवटीतील बंदबाबत शासनाकडून कोणताही सूचना नसल्याने बाजार समितीचे कामकाज सुरूच राहील, असे सचिव अरुण काळे यांनी सांगितले. 

सिडको, इंदिरानगर पाच दिवस बंद 
सिडको : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिडको व इंदिरानगर परिसरातील किराणा दुकांनासह अत्यावश्‍यक व्यवसाय बुधवार (ता. 24)पासून ते रविवार (ता. 28) पर्यंत बंद करण्याचा निर्णय सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. 

पहा गावात काय स्थिती आहे । बाजार पेठा पूर्ण बंद#nashikonweb #कोरोना #ShareWithPride #coronavirus #नाशिक #Nashik

Dikirim oleh Nashik On Web pada Selasa, 23 Juni 2020
for video click link


दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारा माल नाशवंत असतो. याशिवाय अधीच अडचणीत सापडलेल्या बळीराजाला त्यातून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे बाजार समितीसह खते, बी-बियाण्यांची दुकाने सुरूच राहणार आहेत. याशिवाय दवाखाने, औषधांची दुकानेही सुरूच राहतील. 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.