ylliX - Online Advertising Network

मनुस्मृती पुरस्कर्त्यांकडून भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; तुमचा दाभोलकर करू

मनुस्मृती हा पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. ही मनुस्मृती जाळल्याने नष्ट होईल हा तुमचा गैरसमज असून असे कृत्य केल्यामुळे आम्हास तुम्हाला संपवण्यास वेळ लागणार नाही अशी धमकी देणारे तीन पाणी पत्र भुजबळ यांच्या नाशिकच्या घरी प्राप्त झाले आहे. याबाबत माजी आमदार जयवंत जाधव यांनी नाशिक पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार नोंदवली आहे. pro manusmriti murder threaten chhagan bhujbal complaint registered nashik police

हे तीन पाणी पत्र टंकलिखित करण्यात आले असून यात शिवराळ भाषा वापरण्याबरोबरच भुजबळांचा एकेरी उल्लेख देखील करण्यात आला आहे. मनुस्मृतीचे पुरस्कर्ते भिडे गुरुजी आणि त्यांचे धारकरी यांची ताकद काय आहे हे माहित करून घ्यावे असा सल्लावजा इशारा देखील भुजबळांना देण्यात आला आहे. यापुढे गुरुजींबद्दल बोलाल तर परिणामांना सज्ज राहा, समीर भुजबळांनाही आम्ही धडा शिकवणार आहोत.

यापुढे गुरुजींबद्दल काहीही बोलल्यास तुमचा दाभोलकर- पानसरे करू अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. यासंदर्भात आज (दि. 28) या धमकीची गंभीर दखल घ्यावी. संबंधितांवर त्रेत कडक कारवाई करावी अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कोंडाजीमामा आव्हाड, अॅड. रवींद्र पगार, विष्णुपंत म्हैसधुने यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

NashikOnWeb च्या प्रतिनिधीकडे प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले की,

धमकीच्या पत्राला मी फार  किंमत देत नसून घाबरत देखील नाही. जर मला कोणी मनुस्मृतीच्या समर्थनासाठी धमकावत असेलतर महात्मा फुलेंनी ज्या मनुस्मृतीला जाळा म्हटले ती पुन्हा पुन्हा जाळणार आहे. समतेच्या मार्गावर माझा प्रवास सुरूच राहणार असून, लढतच राहणार. कोणाला वाटेल ते करावे ” छगन भुजबळ

ते तीन पानी पत्र आहे तसे :

pro manusmriti murder threaten chhagan bhujbal complaint registered nashik police
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.