ylliX - Online Advertising Network

Prisoners CM Fund Corona कारागृहातील कैद्यांचे मुख्यमंत्री सहायता निधीस २ लाख ७८ हजार

नाशिक : कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी मोठया प्रमाणात आर्थिक निधीची गरज आहे. ते बघता दानशुरांनी पुढे येउन मदत करावी असे आवाहन करण्यात आले होते. त्यास साद देत नाशिकरोड कारागृहातील कैद्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस २ लाख ७८ हजारांचा धनादेश देत त्यांच्यापरीने मदतीचा हात दिला आहे. Prisoners CM Fund Corona

देशात करोनाचे संकट गडद होत आहे. करोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेदिवस वाढतोय. या संकटाशी सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.

उदयोजक, मंदिर ट्रस्ट, खेळाडू, कलाकार व इतर सर्वजण त्यांच्यापरीने मदत देत आहेत. नाशिकरोड कारागृहातील पक्क्या कैद्यांनी त्यांच्या पगाराचा काही हिस्सा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला आहे. २ लाख ७८ हजार रकमेचा धनादेश कारागृहाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना सुपूर्द केला.

कारागृहात दहा कारखाने असून या ठिकाणी हे कैदी काम करतात.

सुतार काम, लोहार काम, विणकाम, मूर्तीकाम, रसायन, बेकरी आदी कारखाने व शेती देखील आहे. शेतीमध्ये प्रामुख्याने पक्के कैदी काम करतात. त्यांना पगार दिला जातो. तो कारागृह प्रशासनाकडे सुरक्षित ठेवला जातो. शिक्षा संपल्यावर किंवा कैद्यांच्या गरजेनुसार हा पगार कैद्यांना दिला जातो.

कारागृह अधीक्षकांनी कैद्यांना मदतीचे आवाहन केले होते. कैदयांनी देखील त्यास प्रतिसाद देत पगारातील काही रक्कम मदत निधीला दिली. Prisoners CM Fund Corona

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.