अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार वडाळा गावातील शाहरूखचे कृत्य

नाशिक : घरातील लोकांना मारून टाकेल, तुला मारून टाकले अशी वारंवार धमकी देत एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. preteen girl rape vadala goan shahrukh khan police arrested

हा सर्व प्रकार वडाळा गावात घडला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल होताच नराधम शाहरूख सलीम खान (२२, रा़ नानावली, भद्रकाली) या संशयितास भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित नराधम  शाहरूख खान चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस बदनामीची धमकी देत असे. तिने नकार दिला तर तिच्या आई-वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देत असे. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करीत होता. preteen girl rape vadala goan shahrukh khan police arrested

हा सर्व प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. प्रकाराबाबत मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर पीडित मुलीच्या आईने भद्रकाली पोलीस ठाण्यात गाठले आणि फिर्याद दाखल केली.

भद्रकाली पोलिसांनी संशयित खान विरोधात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

preteen girl rape vadala goan shahrukh khan police arrested

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.