ylliX - Online Advertising Network

President’s rule राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

राष्ट्रपती राजवट : राष्ट्रपती राजवट (President’s rule) ही भारत देशाच्या संविधानामधील कलम ३५२,३५६,३६० नुसार लागू केली जाऊ शकते. कलम ३५६ ह्यानुसार कोणतेही राज्य सरकार अल्पमतात आल्यास किंवा कामकाज चालवण्यास असमर्थ ठरल्यास ते बरखास्त करून त्या राज्याचा कारभार थेट केंद्र सरकारद्वारे चालवला जातो. राष्ट्रपती राजवटीदरम्यान त्या राज्याच्या राज्यपालाला बहुतेक घटनात्मक अधिकार असतात.

आजवर भारतामध्ये १२६ वेळा राष्ट्रपती राजवटीचा वापर करण्यात आला आहे.इशान्येतील राज्य मणिपूर आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे १० राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे तर छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली नाही. सध्याच्या घटकेला केवळ जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट सुरू आहे.

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

कलम ३५६ नुसार घटकराज्य शासन कारभार राज्यघटनेनुसार चालणे अशक्य असल्याचे प्रतिवृत्त प्राप्त झाले, अथवा राष्ट्रपतींना तशी खात्री पटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा काढून अशा प्रकारची संकटकालीन घोषणा करू शकतात. तसेच घोषणा दुसऱ्या अध्यादेशाद्वारे समाप्तही करू शकतो.

संसदेने अशा घोषणेला मान्यता दिल्यानंतरच तिचा अंमल फक्त सहा महिने इतका असतो. परंतु संसद या घोषणेला पुन्हा पुढील सहा महिन्यांसाठी मान्यता देईल असे स्पष्ट करण्यात आले. अशा प्रकारे या घोषणेचा अंमल तीन वर्षापर्यंत राहू शकतो.

प्रत्येक वेळी एक वर्ष असे लागोपाठ तीन वेळा मान्यता दिल्यास तीन वर्षे तिचा अंमल राहू शकतो. त्याचे परिणाम असे की, ही घोषणा करताच राष्ट्रपती राज्य सरकारची सर्व सत्ता (उच्च न्यायालय कार्य सोडून) स्वतःकडे घेतात किंवा राज्यपालांकडे सोपवतात.संसदेकडे राज्यविधिमंडळाची कार्ये सोपवू शकतात, किंवा स्वतःच्या आदेशानुसार कोणत्याही अधिकाऱ्यांना करावयास सांगू शकतात.

लोकसभेची बैठक नसल्यास राज्याच्या संचित निधीतून पैसा खर्च करण्याचा आदेश देऊ शकतात. या घोषणेच्या पूर्ततेसाठी प्रासंगिक अथवा आनुषांगिक व्यवस्था राष्ट्रपती करू शकतो. 
परंतू उच्च न्यायालयाची सत्ता स्वतःकडे अगर दुसऱ्याकडे देऊ शकत नाही. या सर्व परिस्थितीमध्ये घटकराज्याच्या विधानसभेचे विसर्जन करू शकतो. President’s rule

भारतातील कोणत्या राज्यात आणि महाराष्ट्रात कधी लागली होती राष्ट्रपती राजवट?

भारतात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट पंजाबमध्ये १९५१ मध्ये लागू केली होती. भारतात असे कुठलेही राज्य नाही जिथे कधीच राष्ट्रपती राजवट लागली नाही. महाराष्ट्रात दुसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली.

महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा १९८० साली शरद पवारांचे पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार बर्खास्त करून १७ फेब्रुवारी १९८० रोजी राष्ट्रपती राजवट लागू झाली, आणि ती ९ जून १९८० ला काढण्यात आली.

 • राज्यघटनेच्या कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणबाणी लागू हाेते,
 • 360 नुसार आर्थिक आणीबाणी आहे
 • 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येते
 • राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास राज्याची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे
 • विधानसभेच्या कार्याचे अधिकार संसदेकडे
 • उच्च न्यायालयावर कुठलाही परिणाम नाही
 • दाेन महिन्याच्या आत याला संसदेची संमती लागते
 • 6 महिन्यापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करता येते , सहा महिन्यांहून अधिक काळ राष्ट्रपती राजवट लागू करायची असल्यास निवडणूक आयाेगाची संमती
 • राष्ट्रपती राजवट पुढे तीन वर्षे लागू केली जाऊ शकते तीन वर्षाच्या पुढे ती ठेवता येत नाही.
 • राष्ट्रपती राजवट लागू झाली याचा अर्थ राज्याची सर्व सत्ता ही राज्यपालांच्या हाती
 • मुख्य सचिव राज्याचा कारभार चालवितात.
 • नवीन मुख्यीमंत्री नेमेपर्यंत ही राष्ट्रपती राजवट सुरु राहते
 • राष्ट्रपती राजवट कधीही मागे घेतली जाऊ शकते
 • राज्यपालांना या काळात धाेरणात्मक निर्णय घेता येत नाहीत
 • दरराेजचा राज्यकारभार ते चालविता
 • राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या राज्याचं बजेट संसद पास करु शकते.
 • परंतु प्रत्यक्ष मुख्यंमत्र्यांना असणारे अधिकार प्रत्यक्ष राज्यपालांना वापरता येत नाहीत. 

दोनवेळा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट

महाराष्ट्राच्या इतिहासात दोनवेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे. १९७८ आणि २०१४ मध्ये महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीखाली होते. तर शरद पवार यांच्या १९७८ मध्ये नेतृत्वाखाली पुलोदचं सरकार होतं. हे सरकार बरखास्त करून तेव्हा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेतल्या गेल्या, त्यामुळे १७ फेब्रुवारी ते ९ जून १९८० या काळात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. नंतर २०१४ मध्येही महाराष्ट्र राष्ट्रपतीखाली गेलं. ही राष्ट्रपती राजवट ३२ दिवसांसाठी होती.

राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढल्याने सरकार पडले होते, त्यानंतर २८ सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४ यादरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. President’s rule

Share this with your friends and family

You May Also Like

3 thoughts on “President’s rule राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.