नागपूरः मोबाईलवर पॉर्न फिल्म बघून वेगवेगळ्या प्रकारे शारीरिक संबंध प्रस्थापित एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. सेक्स करण्याच्या नादात एका तरुणाचा गळफास लागून मृत्यू झालाय. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉजवर घडली आहे. मृत्युमुखी पडलेला तरुण 27 वर्षांचा असून, तो पेशाने इंजिनीअर होता. विशेष म्हणजे त्या तरुणाचं लग्न सुद्धा झालं होतं आणि त्याने प्रेमिकेसोबत हा सगळा प्रकार केला असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय. (Engineer Dies Of Strangulation While Having Sex In Nagpur)porn sex death
नागपुरातील टेकानाका परिसरात राहणाऱ्या तरुणाचे हबीबनगर, टेकानाका, नागपूर येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध हाेते. हा २७ वर्षीय तरुण इंजिनिअर असून, बेराेजगार हाेता. ती तरुणी नागपूर शहरातील एका खासगी कंपनीत नाेकरी करते. दाेघेही गुरुवारी सायंकाळी दहेगाव (रंगारी) परिसरात फिरायला आले. सेक्स करण्यासाठी त्यांनी दहेगाव (रंगारी) परिसरातील महाराजा लाॅजमध्ये एक खोली बुक केली. त्या खाेलीत दाेघांनीही माेबाईलवर ‘पाॅर्न क्लिप’ बघितली. त्यांनी त्या ‘क्लिप’मधील पद्धतीने सेक्स करायला सुरुवात केली.
तरुणी बाथरूममध्ये गेली असता तो तरुण खुर्चीसह खाली कोसळला
ताे तरुण खुर्चीवर बसला. त्याचे दाेन्ही हात व पाय दाेरीने बांधले हाेते. गळ्यालाही दाेरीने फास बांधला हाेता. सेक्स आटाेपल्यानंतर तरुणी बाथरूमध्ये गेली आणि नियंत्रण सुटल्याने तरुण खुर्चीवरून खाली पडला. त्यातच गळ्याला बांधलेल्या दाेरीचा फास आवळला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ती बाथरूममधून बाहेर येताच हा प्रकार तिच्या लक्षात आला. तिने लगेच लाॅज व्यवस्थापकाला माहिती दिली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला.porn sex death
याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी त्या तरुणीच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद केली आहे. पोलिसांनी सगळ्याच बाजूने तपास सुरू केलाय. मात्र घडलेली घटना ही अगदी विचित्र प्रकारची असल्याने या घटनेची मोठी चर्चा होत आहे.porn sex death