लासलगावमधून प्रथमच ४ मॅट्रिक टन डाळींब अमेरिकेला रवाना
भारत हा जगातील प्रमुख डाळींब उत्पादक देश आहे, तर महारष्ट्र हे प्रमुख डाळींब उत्पादक राज्य आहे. दिवसेंदिवस डाळींब पिकाखालील क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात डाळींबाची लागवड प्रामुख्याने नाशिक, सोलापूर, अहमदनगर, सांगली, पुणे सातारा, उस्मानाबाद या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच बुलढाणा, जालना, बीड, औरंगाबाद, जळगाव या जिल्ह्यांतही क्षेत्र वाढत आहे.
महाराष्ट्रातल्या शेती उत्पादनांना विशेषत: फळांना परदेशात चांगली मागणी मिळत असून तिच्यातून कोटय़वधी रुपयांचे परकीय चलन मिळत आहे. लासलगाव येथील भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर मध्ये प्रथमच डाळींब वर विकिरण प्रक्रिया करून ४ हजार किलो डाळिंब अमेरिकेला निर्यात करण्यात आलेले आहे.
दरवर्षी लासलगाव मध्ये आंब्यावर विकिरण होत होते यंदा प्रथमच डाळींब वर विकिरण प्रक्रिया करून ४ मॅट्रिक टन डाळींब हे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेला पाठविण्यात आल्याची माहिती प्लान्ट इंचार्ज प्रणव पारेख यांनी दिली आहे. या पहिल्या कंसायमेंट मधून ४ मॅट्रिक टन डाळींब हे लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून प्रक्रिया होऊन मुंबई मार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला. प्रथमच येथून डाळींब प्रक्रिया होऊन अमेरिकेला पाठविण्यात आलेला आंहे.त्यामुळे डाळींब सिझन संपेपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रक्रिया होऊन डाळींब हे निर्यात होऊन देशाला परकीय चलन मिळण्यास मदत होणार आहे.