मसाज, स्पा आणि ब्युटी पार्लरवर धाडसत्र सुरू

नाशिक पोलिसांनी शहरातील मसाज, स्पा आणि ब्युटी पार्लरवर धाडसत्र सुरू केले आहे. यात  देहविक्री करणाऱ्या १५ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहर गुन्हे शाखेच्या तीन युनिटने संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत एक स्पा, एक आयुर्वेदिक मसाज आणि एका ब्युटी पार्लरवर छापे टाकले. या स्पा व ब्युटी पार्लरमध्ये अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती.

शहरात स्पा, मसाज आणि ब्यूटी पार्लरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय चालवले जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. यापूर्वीही पोलिसांनी या स्पा व ब्युटी पार्लरवर कारवाया केल्यात. मात्र पोलिसांची पाठ फिरताच त्यांनी पुन्हा व्यवसायाला सुरू केल्याचे समोर आले आहे. शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या गंगापूररोड, कॉलेजरोडवरील अनेक स्पा आणि मसाज सेंटर आपोआप बंद झाल्याचे निदर्शनास आले होते. दिवाळीत पुन्हा एकदा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारुन ३ ठिकाणी चालणार्‍या अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश केला.

याबाबत पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्ती चौकात ग्लोअप स्पा, गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील प्रसाद सर्कलजवळील आयुर्वेद मसाज सेंटर आणि सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील पंडित कॉलनीतील शुभांगी ब्यूटी पार्लर येथे ही कारवाई केली. त्यासाठी पोलिसांनी आधी बनावट ग्राहक पाठवून या ठिकाणी देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्री केली. त्यानंतरच या ठिकाणी पोलीस निरीक्षकांनी आपल्या पथकांसह छापे टाकले. या छाप्यात एकूण १५ महिलांना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांना सहकार्य करणारा एक व्यक्ती, दोन ग्राहकांनाही ताब्यात घेतले. यातील ६ संशयितांवर पिटा अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर १२ पीडित महिलांना वात्सल्य महिला साधारगृहात ठेवण्यात आले आहे.

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.