ylliX - Online Advertising Network

मालेगाव तालुका : पोलिस महानिरीक्षकांनी केले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलंबित

मालेगाव तालुका : पोलिस महानिरीक्षकांनी केले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलंबित

नाशिक : बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी पोलिस महानिरीक्षक व्ही. के. चौबे यांनी  मालेगाव येथील शहर वाहतूक शाखेत पोलिस निरीक्षकपदी नियुक्त असलेले व तत्कालीन तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल दिगंबर बडगुजर यांना विविध गुन्ह्यांच्या तपासात बेशिस्त, बेपर्वाई व सेवेतून निलंबित केले आहे.

बडगुजर  तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी असताना यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तपासात आरोपींना मदत करणे, न्यायालयात वेळेत आरोपपत्र दाखल न करणे, गुन्हा विलंबाने दाखल करणे अशी कसूर केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. मालेगावचा रहिवासी असलेले सागर प्रल्हाद हिरे याने ३ ऑगस्ट रोजी मुंबई येथे बडगुजर यांच्या जाचाला कंटाळून पोलिस महासंचालकांच्या दालनाबाहेर विषप्राशन करून आत्पहत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी बडगुजर यांचा निलंबन आदेश काढण्यात आला असून, त्यात गेल्या वर्षीच्या चार वेगवेगळ्या गुन्ह्यांत त्यांनी कामात कसूर करून गुन्हेगारांना मदत केल्याचे आढळून आले आहे.

हिरेचे प्रकरण भोवले

आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारा सागर हिरे याचे वडील प्रल्हाद हिरे व चुलते दादाजी हिरे यांच्यात जमिनीवरून वाद होते. या वादातूनच सागरवर चाकू हल्ला झाल्याची घटना ६ जुलै २०१६ रोजी घडली होती. याबाबत सागरने येथील तालुका पोलिस ठाण्यात दादाजीविरोधात तक्रार नोंदवली होती. दरम्यान, त्याला १३ ऑगस्ट रोजी डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात नेले असता त्याच्याविरुद्ध दादाजी यांनी सुनेला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खोटी तक्रार नोंदवली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्याकडे होता. त्यांनी सागरकडून या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. त्यावर सागरने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतरही त्याच्यावर दुसरा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतरही तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याकडून पैशांची मागणी झाल्याने अखेर सागरने पोलिस महासंचालकांकडे दाद मागण्यासाठी मुंबई गाठले होते. अखेर या प्रकरणासह अन्य प्रकरणांतील बेशिस्त आणि बेपर्वाईमुळे बडगुजर यांना निलंबित करण्यात आले आहे.

मालेगाव – विशेष पोलीस पथक बरखास्त -हर्ष पोद्दार

मालेगाव शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी २० पोलीस विशेष पथक स्थापन करण्यात आले होते,हे पथक आता बरखास्त करण्यात आले असून लवकरच नवीन पथक कार्यान्वित करण्यात येणार अशी माहिती मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.

सर्व पोलिसांना कामाची संधी मिळाली पाहिजे अश्या भावनेतून नवीन पथकात नवीन कर्मचारी नेमण्यात येणार अशी माहिती त्यांनी दिली.हर्ष पोद्दार यांनी मालेगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली २० पोलीस पथक स्थापन करण्यात आले होते,या पथकाने संपूर्ण विभागात छापे टाकून गुन्हेगारी ला आळा बसविला होता,अवैध धंदे,दारूचे धंदे जवळपास हद्दपार झाले होते,आता हे पथक बरखास्त झाल्याने नवीन पथक केव्हा स्थापन होणार या कडे मालेगावकरांचे लक्ष लागले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.