चोरीच्या २० लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
नाशिक : कष्ट करत विकत घेतलेल्या वस्तू जेव्हा घरफोडीत किंवा अन्य कारणाने चोरीला जातात तेव्हा त्या परत मिळणार नाहीत म्हणून अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र नाशिक पोलिसांनी ज्या चोरीच्या गुन्ह्याची उकल केली आहे त्यातील अनेक वस्तू पोलिसांनी परत मिळवत नागरिकांना पुन्हा परत दिल्या आहेत.
यामध्ये नाशिक शहर पोलिसांनी आॅक्टोबर ते डिसेंबर महिन्यात शहरात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या सोनसाखळी, दुचाकी चोरी, मोबाईल चोरी, घरफोडीच्या विविध गुन्ह्यांची उकल केली आहे. तर यामधील संशयितांच्या अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या मौल्यवान वस्तू हस्तगत करुन मुळ मालकांना समारंभपुर्वक प्रदान केल्या आहे. यावेळी महिलांचा मौल्यवान दागिना अर्थात सौभाग्याचं लेणं मंगळसूत्र चोरीला गेले होते ते हातात सन्मानपुर्वक दिले गेले आहे. यावेळी सर्वांच्या चेहरयावरील आनंद दिसून येत होता.
याप्रकरणात शहरातील पोलीस स्टेशन भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर, आडगाव, म्हसरुळ, मुंबईनाका, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅ म्प, सातपुर, अंबड या सर्व पोलीस ठाण्यांमधील विविध गुन्ह्यांची उकल करुन सुमारे २० लाख २५ हजार ४३२ रुपयांचा मुद्देमाल महाराष्ट्र टाईम्सचे नाशिक आवृतीचे संपादक शैलेंद्र तनपुरे, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते समारंभपुर्वक प्रदान करण्यात आला आहे. व्यासपिठावर उपआयुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे आदि उपस्थित होते.
दरम्यान, कोकाटे व मगर यांनी उपस्थित नागरिकांना विविध गुन्हयांच्या घटनांपासून कशी सावधगिरी बाळगावी याविषयी मार्गदर्शन केले, याठिकाणी सभारंभात प्रातिनिधीक स्वरुपात मुद्देमाला परत केला त्यामध्ये अमोल जाधव, जाकीर काजी, सोनल रसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहेत.
यामध्ये मुद्देमाल पुढील प्रमाणे.
- आठ लाख ५६ हजार २८७ रुपये किंमतीच्या २२ दुचाकी,
- ८ लाख ५६ हजार २८७ रुपये किंमतीच्या १२ सोनसाखळी,
- १ लाख ६८ हजार रुपयांचे ९ मोबाईल संबंधित मुळ मालकांना वाटप करण्यात आले