पोलिस अधिकारी अपघातात ठार
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक-पुणे महामार्गावरील आळेफाटा ते चंदनापुरीदरम्यान इनोव्हा आणि बोलेरोच्या समोरासमोरील अपघातात शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय विसपुते यांच्यासह एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक विसपुते पुण्याहून नाशिककडे आपल्या इनोव्हा (एमएच १५, सीटी ६५४३) कारने येत होते. डोळासने परिसरात समोरून आलेली बोलेरो (एमएच १६ एजे ६१४६) व इनोव्हाचा समोरासमोर अपघात झाला होता. या अपघातात संजय विसपुते आणि शाबीरबी पिरमहम्मद शेख (५0, रा. घारगाव) या दोघांचा गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. विसपुते हे पोलीस दलातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा विभागात कार्यरत होते. त्यानंतर २0१५ मध्ये ते नाशिकला बदली होऊन आले होते.