ylliX - Online Advertising Network

कंटेनरमधून गावी जाण्याचा प्रयत्न करणारे ४९ ताब्यात

नाशिक : करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कंटेनरमधून गावी जाण्याचा प्रयत्न करणार्‍या ४९ जणांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांची स्वारबाबा नगर येथील शाळा क्र.२६ मध्ये व्यवस्था करण्यात आली असून त्यांची करोना संसर्ग तपासणी केली जात आहे. Poeple Container travelling Catched

करोनामुळे राज्यात काम करणारे युपी, बिहारचे लोक मिळेल त्या साधनाने त्यांच्या त्यांच्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषत: कंटेनरमधून वाहतुकीचे प्रकार उघडकीस येत आहे.

मंगळवारी पहाटे चार वाजता त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे एक कंटेनर (एम.एच.०४ इबी . ९२२८) हा कंटेनर येत होता. सातपूर पोलिसांनी त्यास अडवून कोठो जात आहे असे विचारले. मात्र समर्पक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता त्यात ४९ जण आतमध्ये दाटिवाटिने बसलेले आढळले.

पोलिसांनी हा कंटेनर जप्त केला असून या लोकांची शाळेत चहापाणी व नाश्त्याची व्यवस्था केली आहे. करोना संसर्ग होऊ शकतो हे माहित असूनही कंटेनरमध्ये लोकांना बसवल्या प्रकरणी कंटेनर चालक पप्पू अब्दुल खान याविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे.

कंटेनर चालक हा मुळचा उत्तर प्रदेशातील बैहरईचचा रहिवाशी आहे. Poeple Container travelling Catched

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.