PM Kisan | आता शेतकर्‍यांना 2000 रु.च्या हप्त्यासोबत मिळेल 3000 रुपयांची गॅरेंटेड मासिक Pension, ‘ही’ आहे प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan ) अंतर्गत सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपयांचे 3 हप्ते म्हणजे वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. PM Kisan scheme / PM kasan maandhan pension scheme pm kisan

आतापर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात या योजनेचे 9 हप्ते म्हणजे 18,000 रुपये आले आहेत.
आता शेतकर्‍यांना पुढील म्हणजे 10व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीसाठी आणि वृद्धत्व सुरक्षित करण्यासाठी सरकारने पेन्शनची सुविधा ’पीएम किसान मानधन योजना’
(PM kasan maandhan pension scheme) सुद्धा सुरूकेली आहे. जाणून घेवूयात याबाबत…

शेतकर्‍यांना मिळेल गॅरेंटेड पेन्शन

पीएम किसान मानधन योजना अंतर्गत 60 वर्षाच्या वयानंतर पेन्शनची तरतूद आहे.
पीएम किसान मानधन  मध्ये थेट रजिस्ट्रेशन करावे लागेल.
यामध्ये कोणत्याही कागदपत्रांच्या कारवाईची आवश्यकता नाही.
पेन्शन योजनेसाठी आवश्यक अंशदान सुद्धा किसान सम्मान निधी अंतर्गत येणार्‍या सरकारी मदतीतून कापले जाईल.

पीएम किसान (PM Kisan) मानधन योजना काय आहे

यात वयाच्या हिेशेबाने मासिक अंशदान केल्यास 60 च्या वयानंतर 3000 रुपये मासिक किंवा 36000 रुपये वार्षिक पेन्शन मिळेल.
यासाठी अंशदान 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत मासिक आहे.
अंशदान सबस्क्रायबर्सच्या वयावर अवलंबून आहे.

मानधन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 1. आधार कार्ड
 2. ओळख पत्र
 3. वयाचा दाखला
 4. उत्पन्नाचा दाखला
 5. शेतीचा सातबारा
 6. बँक खात्याचे पासबुक
 7. मोबाइल नंबर
 8. पासपोर्ट साईज फोटो

फॅमिली पेन्शनची सुद्धा तरतुद

 • पेन्शन योजनेत किमान 55 रुपये आणि जास्तीत जास्त 200 रुपये दरमहिना योगदान द्यावे लागते.
 • याप्रमाणे कमाल योगदान 2400 रुपये आणि मिनिमम योगदान 660 रुपये झाले.
 • 6 हजार रुपयांमधून कमाल योगदान 2400 रुपये कापले गेले तरीसुद्धा सम्मान निधीचे 3600 रुपये खात्यात शिल्लक राहतील.
  यात फॅमिली पेन्शनची सुद्धा तरतूद आहे.

 

पीएम किसान लाभार्थ्यांना कसा होईल फायदा

पीएम किसान अंतर्गत सरकार गरीब शेतकर्‍यांना दरवर्षी 2000 रुपयांचे 3 हप्त्यात 6000 रुपयांची आर्थिक मदत देते.
यातील खातेधारक जर पेन्शन स्कीम पीएम किसान मानधनमध्ये सहभागी झाला तर रजिस्ट्रेशन सहज होते.
आणि जर पर्याय घेतला तर पेन्शन योजनेत दरमहिना कापले जाणारे अंशदान सुद्धा याच 3 हप्त्यांच्या मिळणार्‍या रक्कमेतून कापले जाईल. pm kisan

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.