महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना

शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिकपातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतीमालाचे काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजार पेठेत विक्रीसाठी येतो. साहजीकच शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. सदर शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा बाजार भाव मिळू शकतो. तेव्हा शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टीकोनातून कृषि पणन मंडळ सन 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे. pledge financial scheme

या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा (राजमा), काजू बी, बेदाणा, सुपारी व हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला असुन या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकुण किंमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम 6 महिने (180 दिवस) कालावधीसाठी 6 टक्के व्याज दराने तारण कर्ज देण्यात येते.

या योजनेअंतर्गत राज्य अथवा केंद्रिय वखार महामंडळाच्या गोदाम पावतीवरही शेतकऱ्यांना तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. सदर योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जात असुन सहा महिन्यांचे आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते.   

कृषि पणन मंडळाने या योजने अंतर्गत सन 1990-91 ते 2016-17 अखेर पर्यंत एकुण रू. 16986.76 लाख इतके तारण कर्जाचे वाटप केलेले आहे.शेतमालाचे प्रकारानुसार तारण कर्जाची मुदत व व्याजदर :-

 अ.क्रशेतमाल प्रकारकर्ज वाटपाची मर्यादामुदतव्याज दर
 1सोयाबीन, तुर, मुग,
उडिद, चना,
भात (धान) करडई,
सुर्यफूल, हळद, ज्वारी,
बाजरी,
मका व गहू
एकूण किंमतीच्या 75% रक्कम.
(प्रचलित बाजार भाव किंवा किमान
आधारभूत किंमत
यापैकी कमी
असेल त्या दराने
होणाऱ्या  एकुण किंमतीच्या)
६ महिने६ टक्के
 2वाघ्या घेवडा
(राजमा)
एकूण किंमतीच्या
75% रक्कम.
किंवा रु.3000/- प्रति
क्विंटल
यापैकी कमी असणारी
रक्कम
६ महिने६ टक्के
 3काजू बीएकूण किंमतीच्या
75% रक्कम.
किंवा रु.100/- प्रति
किलो
यापैकी कमी असणारी
रक्कम
६ महिने६ टक्के
 4सुपारीएकूण किंमतीच्या
75% रक्कम.
किंवा रु.100/- प्रति किलो यापैकी
कमी असणारी रक्कम
६ महिने६ टक्के
 5बेदाणाएकुण किंमतीच्या कमाल
75% किंवा जास्तीत जास्त
रु. 7500/- प्रति
क्विंटल
यातील कमी
असणारी रक्कम
६ महिने६ टक्के

शेतमाल तारण कर्ज योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये, अटी व शर्ती खालीलप्रमाणे-

 • शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच शेतीमाल स्विकारला जातो. व्यापाऱ्यांचा शेतीमाल या योजनेअंतर्गत स्विकारला जात नाही.
 • प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतमालाची किमंत ही त्यादिवसाचे बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरविण्यात येते
 • तारण कर्जाची मुदत 6 महिने (180 दिवस) असुन तारण कर्जास व्याजाचा दर 6% आहे.
 • विहित मुदतीत परतफेड केल्यास बाजार समितीकडून कृषि पणन मंडळास 3% प्रमाणे कर्ज व्याजाची परतफेड. (उर्वरीत 3% व्याज बाजार समितीस प्रोत्साहनपर अनुदान). मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज सवलात नाही.
 • स्वनिधीतून तारण कर्जाचे वाटप करणाऱ्या बाजार समितीस तिने वाटप केलेल्या कर्ज रकमेवर 3 % प्रोत्साहनपर व्याज अनुदान.
 •  महिने (180 दिवस) मुदतीनंतर सहा महिन्यापर्यत 8 टक्के व्याज दर व त्याचे पुढील सहा महिन्याकरिता 12 टक्के व्याज दर आकारणी केली जाते.
 • तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणुक, देखरेख व सुरक्षा बाजार समिती विनामुल्य करते.
 • तारणातील शेतमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी संबंधीत बाजार समितीची राहते.
 • राज्य अथवा केंद्रिय वखार महामंडळाच्या गोदाम पावतीवरही बाजार समित्यांकडून तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत हंगाम 2018-19 मध्ये गुळासाठी प्रायोगिक तत्वावर तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुळासाठी तारण कर्ज देण्यासाठी खालील प्रमाणे प्रमुख अटी शर्ती राहतील.

 • गुळासाठी तारण कर्ज योजना राबविणा-या बाजार समितीने  या योजनेसाठी 50% निधी स्वफंडातून देणे बंधनकारक राहील. त्यानुसार बाजार समितीने गुळासाठी शेतक-यांना दिलेल्या तारण कर्जापैकी 50% रक्कमेची प्रतिपुर्ती पणन मंडळाकडून करुन दिली जाईल.
 • गुळाकरिता अडीच महिन्यांसाठी चालू बाजार भावाच्या 70% रक्कम या मर्यादेत तारण कर्ज देण्यात यावे. अडीच महिन्यांचे कालावधीत संबंधित शेतकऱ्याने तारणातील गुळाची उचल करून तारण कर्जाची परतफेड न केल्यास सदर गुळाची बाजार समितीने विक्री करून कर्ज व व्याजाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम शेतकऱ्यास अदा करावी.
 • बाजार समितीने गुळ तारण योजनेत स्विकारण्यापुर्वी सदर गुळाचे लॅब टेस्टींग करुन घेणे अनिवार्य असून योग्य प्रतीचा गुळ तारणात स्विकारण्याची जबाबदारी बाजार समितीची राहील.
 • तारण योजनेत स्विकारलेला गुळ साठविण्यासाठी संबंधीत बाजार समित्यांनी  योग्य अशी शितगृहाची  सुविधा उपलब्ध करावी.
 • तारणातील गुळासाठी आवश्यक तो विमा उतरविण्याची जबाबदारी बाजार समितीची राहील.pledge financial scheme

रोजचा कुठल्याही शेतमाल बाजार भाव व्हाट्सऐप वर मिळविण्यासाठी इथे क्लिक करा.

बाजारभावNashikOnWeb.com – रोजचा कुठल्याही शेतमाल बाजार भाव मिळविण्यासाठी जॉईन करा.https://t.me/bajarbhav

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.