प्लॅस्टिकबंदीच्या दंडापोटी 10 हजारांची चिल्लर; प्रशासनाची दमछाक

नाशिक, चेहेडी :

नाशिकमध्ये सध्या प्रशासनाकडून प्लास्टिकबंदीवर जोरदार कारवाई सुरु आहे. Plastic Ban Maharashtra Fine Coins worth ten thousand Nashik NMC

अशाच प्रकारे कारवाई करतांना एका व्यापाऱ्याने तब्बल दहा हजार रुपयांचा दंड चक्क सुट्या पैशांच्या अर्थात चिल्लरच्या स्वरूपामध्ये भरला आहे. त्यामुळे दंड म्हणून भरलेले दहा हजार रुपये मोजतांना प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना चांगलाच वैताग झाला.

नाशिक शहरात प्रशासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या वेगवेगळ्या पथकाकडून प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकाकडून दंड आकरण्यात येत आहे. Plastic Ban Maharashtra Fine Coins worth ten thousand Nashik NMC

या अंतर्गत नाशिकच्या सिन्नर फाटा परिसरात असलेल्या एका वाईन शॉपमध्ये प्लास्टिक वापरत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे कारवाई  करण्यात आली. दुकान मालकाला दंड ठोठवण्यात आला.

या वाईन शॉपच्या मालकाने चक्क दंड दहा हजार रुपये चिल्लरच्या स्वरुपात दिले. एकदम एवढी चिल्लर पाहून महापालिकेच्या पथकावर कपाळाला हात लावण्याची वेळ आली.

दुसरीकडे दंड चिल्लरमध्ये दिल्याने तो नाकारताही येत नसल्याने प्रशासनावर इतके पैसे मोजावे लागले.

Plastic Ban Maharashtra Fine Coins worth ten thousand Nashik NMC
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.