ylliX - Online Advertising Network

लासलगाव : जिजामाता प्राथमिक शाळेत प्लॅस्टिक बंदी जनजागृती मोहिम ​उत्साहात

लासलगाव (वार्ताहर) समीर पठाण

येथील जिजामाता प्राथमिक शाळेत प्लॅस्टिक बंदी जनजागृती मोहिम राबवण्यात आली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अनिस काजी यांनी प्लास्टिक बंदी अंतर्गत कोणत्या वस्तुंच्या वापरावर बंदी आहे तसेच कोणत्या प्लास्टिकच्या वस्तु आपण वापरू शकतो याची सविस्तर माहिती विद्यार्थी व पालकांना दिली. Plastic Ban Awareness Jijamata Primary School Lasalgaon News Nashik

पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्व नागरीकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कमी होत चाललेले पर्जन्यमान हे पर्यावरन असंतुलनाचे कारण आहे. प्लॅस्टिक कुजत व सडत नसल्यामुळे ते जमिनीत वर्षनुवर्ष तसेच राहते. त्यामुळे जमिनीत पाणी झिरपत नाही व पर्यायाने पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे त्यासाठी प्लॅस्टिक बंदी ही काळाची गरज असल्याचे  प्रतिपादन मुख्याध्यापक अनिस काजी यांनी या प्रसंगी केले. त्याच प्रमाणे प्लास्टिक न वापरण्याची प्रतिज्ञा विद्यार्थी व शिक्षकांनी घेतली,आपली शाळा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प या प्रसंगी करण्यात आला. Plastic Ban Awareness Jijamata Primary School Lasalgaon News Nashik

शासनाने लागू केलेली प्लास्टीकबंदी ही जंगले नद्या व जलाशयांना मिळालेली “संजीवनी” आहे! तिचे न कुरकुरता स्वागत करुया! सवयी बदलुया,देश बदलुया असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. प्लॅस्टिक ला पर्याय म्हनुन कागदी व कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन सर्वांना करण्यात आले.
तसेच शाळेमद्ये इ.४ थी च्या वर्गात कागदी पिशव्या निर्मितीची कार्यशाळा घेण्यात आली.

वर्गशिक्षक समीर देवडे यांनी विद्यार्थ्यांना कागदी पिशवी बनविन्याचे प्रात्याक्षिक देवुन सर्व विद्यार्थ्यांकडुन सुबक,आकर्षक व टिकावु कागदी पिशव्या बनवुन घेण्यात आल्या तसेच विद्यार्थ्यांनी पालक व शेजारील लोकांनादेखील कागदी व कापडी पिशव्या वापरन्याचे आव्हान करण्या विषयी जागृत केले. शाळेच्या वतीने प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती फलक तयार करण्यात आले होते.

सदर कार्यशाळा व जनजागृतीसाठी शाळेचे शिक्षक कैलास भामरे, दिलीप शिरसाठ, सुहास बच्छाव, राजाराम जाधव, योगीराज महाले, केदुबाई गवळी, हर्षदा बच्छाव, बद्रीप्रसाद वाबळे, बाळासाहेब वाजे यांनी नियोजन व परिश्रम घेतले.

IMP News:

साक्री : लहान मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून मारहाण; पाच जणांचा मृत्यू

लासलगांव बाजार समितीचे साप्ताहीक समालोचन 25 ते 30 जून

बहुउद्येशीय ग्राहक जागरण प्रबोधिनीकडून खडकमाळेगाव वस्ती शाळेस आर.ओ. फिल्टर भेट

 

Plastic Ban Awareness Jijamata Primary School Lasalgaon News Nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.