ylliX - Online Advertising Network

pimpalgaonbaswant tollplaza डॉक्टर महिला प्रवाशाला अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ करून मारहाण

नाशिकमधील (Nashik) पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरील (pimpalgaon baswant toll plaza) महिला कर्मचारी आणि प्रवाशी तरुणीमध्ये फ्री स्टाईल मारामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 100 रुपयांच्या नोटीवरून हा वाद झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी टोल कर्मचारी महिलेला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.pimpalgaonbaswant tollplaza

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव टोल प्लाझावरील महिला कर्मचाऱ्यांच्या भाईगिरीचे चटके लोकप्रतिनिधींपासून (Gundagiri at Pimpalgaon Toll Plaza) सामान्यांना अनेकदा बसले आहेत. (People facing issues with managements) पंधरा दिवसांपूर्वी शंभर रुपयांची नोट फाटलेली असल्याच्या कारणावरून दोन महिला कर्मचाऱ्यांनी एका डॉक्टर महिला प्रवाशाला अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा व्हिडिओ (VDO Viral On Social media) समोर आला आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, नागरिकांकडून त्याचा निषेध नोंदविला जात आहे. प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. महिला कर्मचाऱ्यांनी माफी मागत त्यांच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई झाल्याने वादावर पडदा पडला. मात्र ही पहिलीच घटना नाही. त्यामुळे टोल वसुली करणाऱ्यांनी जाणीवपूर्वक या नाक्यावर गुंडगिरी करणारे कर्मचारी तर नेमलेले नाहीत ना? असा संशय व्यक्त होत आहे. कारण या महिलांनी यापूर्वी स्थानिक आमदारांशीही असभ्य वर्तन केल्याने वाद झाला होता. साामन्य नागिरकांनी तर हा त्रास नित्याचाच झाला आहे.अशा स्थितीत पोलिसांनी या सर्वच कर्मचाऱ्यांचे पूर्वचारित्र्य पडताळावे अशी मागणी होत आहे. त्यांना असभ्य व दांडगाई करण्यासाठी कोण प्रोत्साहन देते याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे.

व्हीडियो साठी येथे क्लिक करा

https://www.facebook.com/watch/?v=187716213272165

सर्वांत महागडा टोलनाका; पण नेहमी वादाच्या भोवऱ्यात असलेल्या पिंपळगाव टोल नाक्यावर महिला कर्मचाऱ्यांच्या उर्मटपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. पंधरा दिवसांपूर्वी शिवसेनेचे सटाणा तालुकाप्रमुख प्रशांत पाटील कुटुंबीयासह नाशिकहून सटाण्याला जात असताना रात्री नऊच्या सुमारास ते पिंपळगाव टोल प्लाझावर आले. चौथ्या लेनमध्ये येत त्यांनी शंभर रुपयांची नोट महिला कर्मचारी वर्षा हिरे यांना दिली. हिरे यांनी ही नोट फाटकी आहे, चालणार नाही, अशा दमबाजीच्या स्वरात पाटील यांना सुनावले. पाटील यांनी नोट चांगल्या स्थितीत आहे, हवे तर वरिष्ठांना विचारा, असे महिला कर्मचाऱ्याला सांगितले. त्यातून शाब्दिक चकमक वाढत गेली. मी पैसे दिलेले असल्याने दांडा बाजूला करून जात असल्याचे सांगितले. त्याच वेळी दोन महिला कर्मचारी तेथे आल्या. अर्वाच्य शब्दांत त्यांनी शिवीगाळ सुरू केली. त्याच वेळी प्रशांत पाटील यांच्या कन्या कारमधून उतरल्या. त्या समजुतीची भूमिका घेत असताना वर्षा हिरे, वैशाली गांगुर्डे यांनी प्रवासी महिलेवर हल्ला चढवत अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख पाटील यांच्यावर बेतलेला प्रसंग उपजिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या समोर मांडला. दुसऱ्या दिवशी हे प्रकरण पिंपळगाव पोलिस ठाण्यात पोचले.
पथकर वसुलीचे नव्याने कंत्राट घेतलेल्या स्कायलॉक प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक योगेश सिंग, महिला कर्मचारी वर्षा हिरे, वैशाली गांगुर्डे यांना पाचारण करण्यात आले. आक्रमक होत कारवाईची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्याकडे केली. शेवटी त्या महिलांचा माफीनामा व तात्पुरत्या निलंबनानंतर प्रकरण मिटले.
दरम्यान, महिला कर्मचाऱ्यांचा हा भाईगिरीचा व्हिडिओ एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहे.pimpalgaonbaswant tollplaza

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.