ylliX - Online Advertising Network

पिंपळगाव बसवंत : पाच वर्षीय निष्पाप बालकाची केली हत्या, जादूटोणा प्रकरण ?

पिंपळगाव बसवंत : पाच वर्षीय निष्पाप बालकाची केली हत्या, जादूटोणा प्रकरण ?

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत यागावातील  इस्लामपूरा भागातील पाच वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या ईदच्या पूर्वसंध्येला झाली आहे. यामध्ये अनेक अंदाज पुढे येत आहेत.

मुलासोबत शारिरीक अत्याचार किंवा ही हत्या जादुटोण्याच्या प्रकारातून झाल्याचा संशय निर्माण झाला आहे. यामध्ये साहिल लुकमान पिंजारी असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. या हत्येमुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. तर यातील तीन संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

निफाड येथील पिंपळगाव बसवंत अल्पवयीन मुलाचे शेजारीच राहणाऱ्या युवकाने अपहरण केले. नंतर त्याची हत्या केल्याचे उघड झाले. यातून पोलिसांनी संशयित युवकाला त्याच्या आईसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

इस्लामपूर भागात लुकमान पिंजारी कुटूंबिय रहिवासी आहे. तर साहिल नावाचा पाचवर्षीय लुकमान पिंजारी यांचा मुलगा शनिवारपासून बेपत्ता होता. त्यासंदर्भात पिंपळगाव बसवंत पोलिसात तक्रारही दाखल आहे. मात्र काल तपास करत असतानाच रात्री साहिल याचा मृतदेह सापडून आला आहे.

तपासात असे समोर आले की  पिंजारी यांच्याच शेजारी राहणाऱ्या युवकाने साहिलचे अपहरण केले होते. समोर आले. त्यानेच काही तरी करत या लहान बालकाचा गळा आवळून खून केला होता. त्यामुळे संतापलेल्या जमावाने संशयित युवकाला बेदम मारहाण केली. परंतु वेळीच पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर संशयित युवकाला त्याच्या आईसह ताब्यात घेण्यात आले आहे.

http://nashikonweb.com/wp-content/uploads/2017/06/Superstition-murder-case-pimpalgaon-baswant

हत्याप्रकरणी भिकन नजीर पिंजारी, शकिला इब्राहिम पिंजारी, नसरीन सादिक पिंजारी या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे नेमके काय प्रकरण आहे पोलिस तपासात आहेत. हत्या जादूटोणा प्रकारणात झाली असावी असे समोर येत आहे.

युवकाला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पोलिस तपास करीत आहेत.

दरम्यान, सदरील युवकाची आई ही जादूटोणा करीत असल्याने या घटनेमागे जादूटोण्याचा प्रकार आहे काय, या शोध पोलीस घेत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.