पेट्रोल पंपावर मशीन सदोष आढळले शहरातील दोन्ही पेट्रोल पंप सील

नाशिकमध्ये दोन पेट्रोल पंपावर मशीन सदोष आढळले शहरातील दोन्ही पेट्रोल पंप सील
नाशिक : नाशिकमध्ये पेट्रोल पंपावरील मशिनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स चीप बसून इंधन चोरीचा प्रकार उघड झाला आहे. शहरातील त्र्यंबक नाका भागातील एका पंपावर पथकाने छापा घालत पंप सील केला आहे. दिंडोरी नाका भागात दुसर्‍या एका पंपाची चौकशी करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील एकूण पंपाची तपासणी केली जाणार आहे.

इलेक्ट्रॉनिक चिपच्या माध्यमातून पेट्रोल व डिझेल चोरी करणारे रॅकेट पकडण्यात आल्यानंतर याच रॅकटेमधील सहा जणांना ठाणे शहर क्राईम ब्रॅचने अटक केली आहे.त्यांच्याकडून राज्यातील काही जिल्ह्यात पेट्रोल पंपावर इलेक्ट्रॉनिक्स चीप बसवण्यात आल्या. त्यांची यादी ठाणे क्राईम ब्रॅचकडे असून या यादीत नाशिक जिल्ह्यातील पेट्रोल पंपाची नावे असल्याचे कळते.या यादीनुसार जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर धाडी टाकल्या जात आहे. यानुसार बकनाका भागात ठाणे क्राईम बँच वैधमापन विभाग हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी अधिकारी आणि जिल्हा पुरवठा विभाग यांनी संयुक्तरित्या जे. आर. मेहता अ‍ॅण्ड सन्स या पेट्रोल पंपावर छापा टाकला. यावेळी पेट्रोल पंपावरील सर्व मशिनची तज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. यात दोन मशीन सदोष असल्याचे आढळून आले. यात एका मशिनमधून प्रति लिटर मागे मि. लि. व दुसर्‍या मशीनमधून मि. लि. पेट्रोल कमी येत असल्याचे तपासणीत आढळून आले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

2 thoughts on “पेट्रोल पंपावर मशीन सदोष आढळले शहरातील दोन्ही पेट्रोल पंप सील

    1. If you have any feedback, complaints or grievances, as a customer, employee or business associate, we would like to hear from you.

      Just click the relevant section below to fill the Bharat Petroleum Feedback Form and lodge a complaint or share your opinion.
      or on Hindustan petrolatum. or which is provider.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.