शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी मातोश्री येथे भेट घेतली आहे. छगन भुजबळ यांची गेल्या आठवड्यात तुरुंगातून जामिनावर सुटका झाली होती, त्यांनी रुग्णालयातून कामाला सुरुवात देखील केली आहे. मात्र या दोघांच्या भेटीने राजकारण बदलणार आहे.
ठाकरे – भुजबळ यांची जवळपास 15 मिनिटं भेट झाली, या भेटीवेळी मिलिंद नार्वेकर देखील होते. मात्र पंकज भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट होती असे सांगण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी पंकज यांना छगन भुजबळांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.विशेष म्हणजे भुजबळ यांनीच आपला मुलगा पंकज भुजबळ यांना पेढे घेवून मातोश्रीवर धाडल्याची चर्चा आहे.
‘सामना’त भुजबळांबद्दल काय म्हटले होते?
“भुजबळ शिवसेनेशी व शिवसेनाप्रमुखांशी वाईट वागले. महाराष्ट्र सदन उभारण्यात घोटाळा झाला नसल्याचे सत्य तेव्हा फक्त ‘सामना’नेच छापले. आम्ही व्यक्तिगत वैर ठेवत नाही. भुजबळ सुटले. त्यांच्या कुटुंबीयांना नक्कीच आनंद झाला असेल. भुजबळांनी त्यांच्या प्रकृतीकडे जास्त लक्ष द्यायला हवे. ते जामिनावरच सुटले आहेत याचे भान त्यांनी सदैव ठेवायला हवे. सुज्ञांस अधिक काय सांगावे!”, असे सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे नवीन राजकारण तयार होते की दुसरे अजून काही कारण आहे, हे पुढे समोर येईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते 10 जूनला पुण्यात भाषण करणार आहेत. तुरुंगातून सुटल्यानंतरचं भुजबळांचं हे पहिलंच भाषण असेल. सध्या राज्यभरात राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा सुरूय. या यात्रेचा शेवट 10 जूनला पुण्यात होईल. छगन भुजबळांच्या भाषणानं या यात्रेचा शेवट करण्याची योजना राष्ट्रवादी काँग्रेसनं आखली आहे.
pankaj bhujbal meeting uddhav thakeray matoshree mumbai
Connect with Us on Whats App : 8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).
Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb
Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb
Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/
आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !
Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com