Pandit Bhimsen Joshi भारतरत्न प. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त संगीत-कानसेन-समाज निर्मितीसाठी

संगीत क्षेत्राला स्वरतेजाने प्रकाशित करणारे स्वरभास्कर, भारतरत्न प. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षाला ४ फेब्रुवारी २०२१ ला सुरुवात झाली. पंडितजींनी भारतीय संगीताला सर्वोच्च शिखरावर तर नेऊन पोहचवलेच परंतु अबाल-वृद्धांमध्ये संगीताविषयी गोडी निर्माण करून खऱ्या अर्थाने कानसेन असा संगीतप्रेमी-समाज घडवला.

पंडितजींनी आयुष्यभर अविरत घेतलेला संगीतसेवेचा वसा संगणकयुगातही अव्याहत सुरु रहावा यासाठी पंडितजींच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त खांडबहाले.कॉम या भारतीय-राजभाषा-डिजिटल शब्दकोशांचे निर्माते संगणकतज्ञ व संगीतप्रेमी नाशिकचे सुनील खांडबहाले यांनी नवकल्पक अशा samaysangit.app अर्थात समय-ऋतुचक्रावर आधारीत डिजिटल संगीत वेबसाईटचे ऑनलाईन प्रसारण सुरु केले आहे.(Launch of samaysangit.app first f its kind, time-based classical-music digital platform on the auspicious occasion of 100th birth anniversary of Bharatratna Pandit Bhimsen Joshi)

 

योग्य वेळी योग्य संगीत ऐकल्यास वृक्षवल्ली-पशु-पक्षासहित सृष्टीतील अखंड प्राणिमात्रांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात” या वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित samaysangit.app या वेबसाईटमध्ये दिवसाचे पूर्वान्ह, मध्यान्ह, अपरान्ह, सायंकाल, प्रदोष, निशिथ, त्रियाम, उषा असे आठ प्रहर आणि वर्षभरातील वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे सहा ऋतू या कालचक्रानुसार मौखिक आणि वाद्य संगीत श्राव्य स्वरूपातील स्वयंचलित-तंत्रज्ञान-कार्यप्रणाली प्रसारण-संरचना विकसित केलेली आहे.

कुठल्याही डाउनलोडशिवाय आपल्या मोबाईल अथवा संगणकाच्या एका क्लिकवर संगीतक्षेत्रातील पूर्वसुरींसोबतच नवोन्मुख कलाकारांच्या सुमधुर संगीत श्रवणाच्या मेजवाणीचा आस्वाद दिवसातील २४ तास व वर्षातील १२ ही महिने संगीतप्रेमींना अखंड घेता येणार आहे. भारतीय संगीत शास्त्राचा प्रचार-प्रसार व्हावा व तरुण पिढीमध्ये सात्विक संगीत श्रवणाची ओढ लागावी या उदात्त हेतूने समयसंगीत.ॲप ही सुविधा कोणत्याही नोंदणीशिवाय व विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. Pandit Bhimsen Joshi

“पंडितजींनी आपल्या स्वर्गीय आवाजाने अजरामर केलेल्या संतवाणीचा विद्यार्थीदशेत माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. संगीत माझ्यासाठी कार्यशक्ती व नवकल्पकता यांचे ऊर्जास्रोत ठरला. Music is the universal language. संगीत ही एक वैश्विक भाषा आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी व अखंडतेसाठी, पंडितजींच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त सद्य-कालानुरूप पंडितजींना आमच्या तंत्रज्ञांनी वाहिलेली ही एक प्रामाणिक अशी डिजिटल-सांस्कृतिक श्रद्धांजली आहे. मिले सूर मेरा-तुम्हारा.. तो सूर बने हमारा..”  असे भावोद्गार यावेळी samaysangit.app चे निर्माते सुनील खांडबहाले यांनी काढले. 

 

Website : www.samaysangit.app 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.