ylliX - Online Advertising Network

कसारा : मालगाडीचे डब्बे घसरले अनेक प्रवासी पंचवटीत अडकले, प्रवासी वर्गाचा संताप

कसारा नजीक मालगाडीचे डबे घसरले असून त्यामुळे मोठा खोळंबा झाला आहे. यामध्ये नाशिकला येत असलेल्या पंचवटीतील प्रवासी वर्गाला मोठा फटका पडला आहे.

९.४० मिनिटांनी नाशिकला येणारी पंचवटी यामध्ये अडकली असून आसनगाव आणि कसारा मध्ये प्रवासी अडकले आहे. त्यामुळे प्रवासी वैतागले आहेत. दुसरीकडे रेल्वेने काम युद्धपातळीवर सुरु केले असून त्यामुळे लवकरच मार्ग मोकळा होईल असे सांगितले जात आहे.

ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात घडला, त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मालगाडीचे घसरलेले डबे रूळावरून हटविण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे, सध्या मध्य रेल्वेची वाहतूक कसाऱ्यापर्यंत न ठेवता आसनगावपर्यंतच सुरू ठेवण्यात आली आहे.

यामुळे मुंबईहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस आणि लोकल ट्रेन्सचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे नाशिकला येत असलेले अनेक प्रवासी मध्येच अडकले आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी संतापले आहेत. पंचवटी एक्स्प्रेस आता कसारा येथे आली आहे.

मालगाडीच्या डबे घसरण्याच्या घटनेमुळे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कसारा स्टेशन गाठणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.

अशा घटना वारंवार घडूनही रेल्वे मंत्रालयाकडून या समस्यांवर ठोस उपाय योजण्यासाठी काहीही पावलं उचलली जात नाहीये. त्यामुळे अजून संताप होतो आहे. येन रात्री कसारा येथे जरी प्रवासी उतरले तरी खासगी रिक्षा आणि टॅक्सीवाले मनाला येईल असे पैसे आकारत आहेत.

Railway Ministry :

Suresh Prabhu : @sureshpprabhu

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.