panchvati crime
गॅस एजन्सीमधील कर्मचाऱ्याचा पाठलाग करून तर त्याला बेदम मारहाण करत त्याच्याकडून साडेसहा लाखाची रोख रक्कम दोघा संशयितांनी लुटल्याची घटना घडली आहे. हा सर्व पंचवटी येथे घडला आहे. हा सर्व प्रकार दिवसा त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. panchvati crime
तपोवन कॉर्नर येथील एच. जोशी यांच्या गॅस गोडावूनमध्ये कॅशियर सतीश साळी काम करतात.
दुपारी सव्वाचारच्या सुमारास नेहमीप्रमाणे दिवसभराची रक्कम मोजून घेतली. आणि ती बँकेतील खात्यात सारस्वत बँकेत भरण्यासाठी टू व्हीलर (क्र. एमएच १५- डीपी ५७८२) घेत निघाले.
याचवेळी कृष्णनगर येथील श्रीकृष्ण गार्डनच्या पाठीमागील बाजूच्या रस्त्याने जात असताना. त्यांच्या पाठीमागून दुचाकी गाडीवरून दोघांनी पाठलाग करत असलेल्या दोघांनी साळी यांच्या गाडीला धक्का दिला. त्यामुळे ते खाली पडले.
यावेळी त्या दोघांनी जबर मारहाण केली. आणि गाडीतील सहा लाख ४४ हजार रुपयांची बॅग काढून पळ काढला.
साळी यांना धक्का बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. परिसरातील दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने त्यांच्यावर पाळत ठेवून लूटमार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. panchvati crime
लुटमारीच्या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, उपनिरीक्षक महेश इंगोले आदींसह गुन्हेशोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची तपासणी केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपास करत आहे. मात्र दिवसा घटना घडल्याने सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. panchvati crime
आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/NashikOnWeb/